पुणे (वृत्तसंस्था) पुणे नाशिक महामार्गावर बिबट्या जखमी झाला आहे. रस्ता ओलांडताना बिबट्याची चारचाकी वाहनासमोर जोरदार धडक झाली. सुदैवाने बिबट्याचा जीव वाचला परंतु बिबट्या गंभीररीत्या जखमी झाला आहे. या घटनेचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
संगमनेर तालुक्यातील चंदनापुरी घाटात घडली आहे. नाशिकच्या दिशेने भरधाव वेगात असलेल्या चारचाकी वाहनांच्या मध्ये अचानक बिबटा आल्याने कारची धडक झाली. या कारच्या धडकेत बिबट्या बोनेटमध्येच अडकला.कारचालकाचे हे लक्षात आल्यानंतर कार चालकाने बिबट्याला वाचविण्यासाठी गाडी मागे घेतली. अक्षरश: अंगावर शहारे आणणारा हा क्षण आहे. परंतु काही वेळाने धडपड करत बिबट्या सुटका करत पळ काढला. वन विभागाकडून बिबट्याचा शोध सुरू आहे.















