नवी दिल्ली (वृत्तसंस्था) भारतीय आयुर्विमा महामंडळ (LIC) नागरिकांसाठी अनेक फायदेशीर योजना आणते. ज्यामध्ये गुंतवणूक (Investment) करून चांगला नफा मिळू शकतो. एवढेच नाही, तर या योजनांमधील गुंतवणुकीवर करात सूटही आहे. जर तुम्ही सुरक्षित गुंतवणुक करण्याची योजना आखत असाल, तर तुमच्यासाठी एलआयसी हा एक चांगला पर्याय आहे. एलआयसी जीवन शिरोमणी योजना (LIC Jeevan Shiromani Plan) ही अशी बचत गुंतवणूक योजना आहे, ज्यामध्ये मोठा नफा मिळवू शकता.
१ कोटी रुपयांच्या विम्याची गॅरंटी
एलआयसीचा जीवन शिरोमणि प्लॅन हा एक नॉन लिंक्ड प्लॅन आहे. यामध्ये तुम्हाला किमान १ कोटी रुपयांच्या सम अश्युअर्डची गॅंरटी मिळते. एलआयसी आपल्या ग्राहकांना जास्तीत जास्त विमा संरक्षण देण्यासाठी या प्रकारचे प्लॅन बाजारात आणते. या पॉलिसीमध्ये किमान परतावा १ कोटी रुपयांचा आहे.
काय आहे प्लॅन
एलआयसीचा जीवन शिरोमणि (टेबल नंबर ८४७) या प्लॅनची सुरूवात डिसेंबर २०१७ मध्ये झाली होती. हा एक नॉन लिंक्ड, मर्यादित प्रिमियम पेमेंट मनी बॅंक प्लॅन आहे. हा एक मार्केटशी जोडलेला प्लॅन आहे. ही पॉलिसी खासकरून उच्च उत्पन्न गटातील व्यक्तींसाठी बनवण्यात आली आहे. हा प्लॅन गंभीर आजारांवर कव्हरदेखील देते. यामध्ये ३ पर्यायी रायडर्सदेखील आहेत.
मिळतो आर्थिक लाभ
पॉलिसीहोल्डर्स जिवंत राहिल्यास मिळणाऱ्या लाभात निश्चित रक्कम दिली जाते. ते खालीलप्रमाणे,
१. १४ वर्षांची पॉलिसी- १० व्या आणि १२ व्या वर्षी सम अश्युअर्डच्या ३० – ३० टक्के
२. १६ वर्षांची पॉलिसी- १२व्या आणि १४ व्या सम अश्युअर्डच्या ३५-३५ टक्के
३. १८ वर्षांची पॉलिसी – १४ व्या आणि १६ व्या वर्षी सम अश्युअर्डच्या ४०-४० टक्के
४. २० वर्षांची पॉलिसी- १६व्या आणि १८ व्या सम अश्युअर्डच्या ४५-४५ टक्के