TheClearNews.Com
Friday, March 20, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

एमबीएचे स्वप्न साकार करताना आयुष्यच हिरावलं; अपघातात वडिलांचा दुर्दैवी मृत्यू !

धरणगावच्या पिंप्रीजवळ दोन वाहनांची समोरासमोर धडक, मुलीच्या डोळ्यांसमोर वडिलांचा मृत्यू !

vijay waghmare by vijay waghmare
May 10, 2025
in गुन्हे, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) परीक्षेची धडपड, मुलीचे उज्ज्वल भविष्य आणि बापाचं मोलाचं साथ…पण नियतीला काहीतरी वेगळंच मंजूर होते. जळगावच्या महेश सोनार यांचं स्वप्न होतं मुलीला एमबीए बनवायचे. आज त्यांनी आपल्या मुलीला नयना हिला अमळनेरला सीईटी परीक्षा देण्यासाठी स्वतः गाडी चालवत नेलं. परीक्षा झाल्यावर परत येताना, पिंप्री गावाजवळ भरधाव बोलेरो पिकअपने त्यांच्या कारला जोरदार धडक दिली आणि क्षणात साऱ्या आयुष्याला हादरा बसला.

या भीषण अपघातात महेश सोनार यांचा जागीच मृत्यू झाला. मुलगी नयना आणि मित्र राजेश धूत गंभीर जखमी आहेत. समोरच्या बोलेरोत लग्नाच्या वऱ्हाडातील काही जणही जखमी झाले आहेत. एका बापाचं स्वप्न पूर्ण व्हायच्या क्षणीच त्याचं आयुष्य संपलं आणि मुलीच्या शिक्षणाच्या वाटेवर दुःखाचं खोल गडद सावट पसरलं. तर हळदीच्या कार्यक्रमासाठी निघालेल्या वऱ्हाडाची गाडीला अपघातात अनेक जण जखमी झाल्यामुळे आनंदाच्या क्षणी दुःखाला सामोरे जावे लागले आहे.

READ ALSO

जळगावच्या जैन हिल्सला केंद्रीय कृषीमंत्र्यांची भेट

भोकर येथील तरुण अपघातात ठारभोकर येथील तरुण अपघातात ठार

ही दुर्दैवी घटना पिंप्री गावाजवळ घडली. जखमींना तातडीने जळगाव शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले आहे. रुग्णालयात नातेवाईकांनी एकच आक्रोश केल्याचे हृदयद्रावक दृश्य पाहायला मिळाले. या अपघातात महेश सुरेश सोनार (वय ५५, रा. रामेश्वर कॉलनी, जळगाव) यांचा मृत्यू झाला आहे. महेश सोनार हे रामेश्वर कॉलनीत पत्नी आणि दोन मुलींसोबत राहत होते आणि पाण्याचे जार वाटपाचा व्यवसाय करून आपला उदरनिर्वाह चालवत होते.

याबाबत अधिक माहिती अशी की, आज अमळनेर येथे त्यांची मुलगी नैनाची एमबीएच-सीईटीची परीक्षा होती. त्यामुळे ते आपली मुलगी नयना आणि राजेश मिठूलाल धूत (वय ४६) यांच्यासोबत कारने अमळनेरला गेले होते. परीक्षा संपवून ते दोघे मुलीसह जळगावकडे परत येत असताना, दुपारी दीड वाजेच्या सुमारास पिंप्री गावाजवळ त्यांच्या कारला समोरून आलेल्या एका बोलेरो पिकअप वाहनाने जबर धडक दिली.

खासदारांनी साधला माजी नगरसेवकशी संपर्क
याच रस्त्यावरून खासदार स्मिताताई वाघ हे अमळनेरकडे जात असतांना त्यांना अपघात झाल्याचे दिसून आले. कारमधील सर्वजण जळगावातील रामेश्वर कॉलनीतील असल्याचे समजल्यानंतर त्यांनी त्या परिसरातील माजी नगरसेवक राजेंद्र घुगे पाटील यांच्याशी संपर्क साधून माहिती दिली. त्यानुसार मयतांच्या नातेवाईकांना अपघात झाल्याची माहिती देण्यात आले. जखमींना जळगावच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. रुग्णालयात पोहोचताच नातेवाईकांनी एकच आक्रोश केला, ज्यामुळे वातावरण अधिक शोकाकुल झाले होते.

हळदीचा कार्यक्रमाला जाणारे वऱ्हाडी जखमी
मात्र, याचवेळी समोरून येणाऱ्या बोलेरो पिकअपमध्ये लग्नाचे वऱ्हाड होते. आज सायंकाळी हळदीचा कार्यक्रम असल्याने वऱ्हाडी मंडळी त्या वाहनातून प्रवास करत होती. या अपघातात बोलेरोमधील काही जणही जखमी झाले असून, त्यांना धरणगाव येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: #jalgaonaccident

Related Posts

कृषी

जळगावच्या जैन हिल्सला केंद्रीय कृषीमंत्र्यांची भेट

March 19, 2026
गुन्हे

भोकर येथील तरुण अपघातात ठारभोकर येथील तरुण अपघातात ठार

March 19, 2026
चाळीसगाव

मोबाईल हॅक करीत शेतकऱ्याच्या बँक खात्यातून परस्पर पैसे लांबवले

March 19, 2026
जळगाव

उन्हाच्या झळा कमी करण्यासाठी पुढाकार : जळगावात जलकुंड व परळ वाटपचा उपक्रम

March 18, 2026
जळगाव

लोकचित्रकलेचा प्रचार आवश्यक – दिपमाला काळे

March 18, 2026
गुन्हे

शिवीगाळ का करतो म्हणत तरुणाला मारहाण करीत दोघ पाय ओढून नेले फरफटत

March 18, 2026
Next Post

Weekly horoscope : आजचे साप्ताहिक राशिभविष्य 11 ते 17 मे 2025 !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

१०० दिवसांच्या मोहिमेत धरणगाव नगरपरिषद नाशिक विभागात प्रथम

May 18, 2025

धक्कादायक ! बर्थडे पार्टीत अल्पवयीन मुलीवर नेत्याच्या मुलाकडून सामूहिक बलात्कार

April 13, 2022

आसोद्यात घरफोडी ; साडेसात हजाराच्या रोकडसह दागिने लंपास !

December 17, 2021

भुसावळात भरदिवसा धाडसी चोरी, २० तोळे सोन्यासह रोकड लंपास !

April 26, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group