भुसावळ (प्रतिनिधी) तालुक्यातील साकेगाव येथे शुक्रवारी रात्री चुडामण नगरातील एका घरावर वीज कोसळून हर्षा गणेश मनोरे (वय ३४) या तरुणीचा मृत्यू झाल्याची घटना घडली.
साकेगाव येथील चुडामण नगरात गणेश मनोरे हे वास्तव्यास असून त्यांच्या घरावर रात्री वीज कोसळली. खिडकी तुटून घरात असलेल्या हर्षा गणेश मनोरे (वय ३४) हिच्या अंगावर वीज पडल्याने ती भाजलेल्या अवस्थेत बाहेर आली. ग्रामस्थांनी तरुणीस तत्काळ जिल्हा रुग्णालयात दाखल केले मात्र, उपचारादरम्यान हर्षाचा मृत्यू झाला.
तरुणीच्या पश्चात आई, वडील व बहीण असा परीवार आहे. या घटनेची माहिती मिळताच शनिवारी आमदार संजय सावकारे यांनी प्रत्यक्ष पाहणी करून तहसीलदार नीता लबडे यांना या नैसर्गिक आपत्तीचा पंचनामा करुन मृत तरुणीच्या परीरवाराला भरपाई देण्याची सूचना केली. या घटनेमुळे साकेगावात हळहळ व्यक्त करण्यात आली.