जळगाव (प्रतिनिधी) तालुक्यातील भोलाने येथील तापी नदीच्या काठावर असलेल्या चार गावठी हातभट्ट्या पोलिसांनी आज पहाटे उद्ध्वस्त केल्या आहेत.
तालुक्यातील भोलाने येथील तापी नदीच्या काठच्या जंगलात गावठी हातभट्टी सुरू असल्याची गुप्त माहिती पोलीस निरीक्षक रविकांत सोनवणे यांना मिळाली होती. त्यानुसार त्यांनी पो.हे.कॉ बापू पाटील, दिपक कोळी, सुशील पाटील, सुधाकर शिंदे यांचे पथक कारवाईसाठी रवाना केले. आज पहाटे ५ ते ८ वाजेच्या दरम्यान पोलिसांच्या पथकाला चार ठिकाणी गावठी हातभट्ट्या दिसून आल्या. पोलिसांनी तात्काळ चारही हातभट्ट्या उद्ध्वस्त केल्या. त्यात ६२ लोखंडी व प्लास्टीक ट्रम, २०० लिटर ६ हजार २०० रूपये किंमतीचे कच्चे व पक्के रसायन, असा एकुण ६२ हजार रूपयांचा मुद्देमाल नष्ट करण्यात आला. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास तालुका पोलीस स्थानकाचे पोलीस कर्मचारी करीत आहे.