धरणगाव (प्रतिनिधी) तालुक्यातील अनोरे शिवारातून ७५ हजाराचे पशुधन चोरीला गेल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी अज्ञात चोरट्यांविरुद्ध धरणगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या संदर्भात अधिक असे की, दि. २० डिसेंबर ते २१ डिसेंबरच्या दरम्यान, प्रमोद भीमराव पाटील (रा. गारखेडे) यांच्या अनोरे शिवारतील शेत गट क्र. २५ मधील शेतातील निंबाच्या झाडा खालून अज्ञात चोरट्यांनी दोन गाय, गोऱ्हा, वगार असे ७५ हजाराचे पशुधन चोरून नेले. या प्रकरणी धरणगाव पोलिसात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पो.ना. चंदूलाल सोनवणे हे करीत आहेत.