मुंबई (वृत्तसंस्था) दोन डोस घेतलेल्या लोकांसाठी मुंबईत लोकल प्रवास सुरू होणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी केली. मुंबईत लोकल प्रवास सुरू करत आहोत. १५ ऑगस्ट स्वातंत्र्यदिनापासून लोकलचा प्रवास लशीचे दोन्ही डोस घेऊन ज्यांना १४ दिवस झाले आहेत त्यांना प्रवासाची मुभा आहे असं मुख्यमंत्री म्हणाले.
राज्यात कोरोनाची दुसरी लाट ओसरत आहे. त्यामुळे काही जिल्ह्यात पहिल्या टप्पा म्हणून काही निर्बंध शिथिल केले आहेत. याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे रविवारी जनतेशी संवाद साधला. यावेळी मुंबईची लाईफलाईन असलेली लोकल सेवा दोन्ही लस घेतलेल्या नागरिकांसाठी येत्या १५ ऑगस्टपासून सुरू करण्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली.
लशीकरण झालेल्या नागरिकांची माहिती अॅपवर टाकली आहे. येत्या काही दिवसात अॅप लॉन्च करण्यात येईल. ऑफलाईन सिस्टमनेही पास देण्यात येईल. १९ लाख नागरिक असे आहेत ज्यांचे लशीचे दोन डोस झाले आहेत आणि लसीकरण होऊन १४ दिवस झाले आहेत. हे नागरिक लोकल प्रवासासाठी पात्र असतील. १५ तारखेपर्यंत अॅप, महापालिकेच्या विभागीय कार्यालयात पास कलेक्ट करावेत.