धरणगाव (विनोद रोकडे) भगवान परशुराम यांची जयंती शहरात विविध ठिकाणी उत्साहात साजरी करण्यात आली. विविध संस्था, संघटनांतर्फे परशुराम यांच्या प्रतिमेचे विधीवत पूजन करुन अभिवादन करण्यात आले. जयंतीनिमित्त संघटनांतर्फे वाहन रॅली तसेच ढोलताशांच्या गरजात मिरवणूक काढण्यात आली.
भगवान परशुराम यांची जयंती शहरात विविध ठिकाणी उत्साहात साजरी करण्यात आली. विविध संस्था, संघटनांतर्फे तसेच समाजाचे अध्यक्ष डॉ किशोर भावे, पालिकेतील गटनेते विनय भावे , शिवसेना उबाठाचे उपशहर प्रमुख किरण अग्निहोत्री , संजय शुक्ल , डॉ अरुण कुलकर्णी, उदय भावे श्रीकांत भावे, भगवान श्रीपरशुराम यांच्या प्रतिमेचे विधीवत पूजन करुन अभिवादन करण्यात आले. जयंतीनिमित्त संघटनांतर्फे वाहन रॅली तसेच ढोलताशांच्या गरजात भजनी मंडळ, महिलांची भव्य उपस्थिती मिरवणूक काढण्यात आली.
परशुराम सेनेतर्फे भगवान परशुराम जयंती विविध कार्यक्रमांचे आयोजन करत साजरी करण्यात आली. धरणगाव येथील भावे गल्लीतील स्मारकास भगवान श्री परशुराम यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. दुपारी बारा वाजता जन्मोत्सव व पाळण्याचा कार्यक्रम घेण्यात आला होता.
यावेळी उपस्थित कार्यक्रमासाठी समस्त शुक्ल यजुर्वेदीय ब्राह्मण समाजाचे समस्त पंचमंडळ अध्यक्ष डॉक्टर किशोर भावे, उपाध्यक्ष ललित उपासनी, सचिव निलेश पाठक, संचालक विनय भावे, गटनेता शिवसेना संचालक महेश भावे, संचालक उदय भावे, संचालक अरुण कुलकर्णी, संचालक श्रीकांत वैद्य उपस्थित होते. संपूर्ण कार्यक्रम यशस्वी करण्याकरता निलेश पाठक, किरण अग्निहोत्री, शुभम जोशी, पराग कुलकर्णी, सौ. दिपाली सागर भावे, आर्यन भावे, आयुष भावे, प्रसाद शुक्ल, कार्यक्रमाची सुरुवात श्री बालाजी मंदिरापासून भगवान श्री परशुराम यांचे विधीवत पूजन करून शोभा यात्रेची सुरुवात करण्यात आली. याप्रसंगी डॉक्टर किशोर भावे व कोमल पैलवान, विजय शुक्ला यांच्याकडून पूजा करण्यात आली. पुरोहित वर्गांकडून मंत्रोच्चार राजेश जोशी, पराग गुरुबा यांनी केले.