TheClearNews.Com
Wednesday, July 30, 2025
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

कालचक्रात हरपलेला, निसर्ग सौदर्याचा पुजारी : बालकवी

वाचा प्रा.बी.एन.चौधरी यांचा लेख

The Clear News Desk by The Clear News Desk
May 5, 2022
in धरणगाव, विशेष लेख
0
Share on FacebookShare on Twitter

धरणगाव (प्रा.बी.एन.चौधरी) ५ मे १९१८. वेळ संध्याकाळ ६ ते ६.३० दरम्यानची. मध्य रेल्वेच्या भादली रेल्वे स्टेशनवर हाहा:कार उडाला होता. एक इसम रेल्वेखाली येवून अपघात झाला होता. क्षणात त्याच्या देहाची लक्तरे झाली होती. काही ओळखीच्या लोकांनी त्यांची ओळख पटवली. आणि लक्षात आले, मराठी साहित्याचा एक राजहंस छिन्नविच्छिन्न अवस्थेत पडला होता. निसर्गाला शब्दरुप देणारा शब्दप्रभू ‘बालकवी’ हरपला होता. निसर्गाला पडलेलं एक गोड स्वप्न क्षणार्धात असं मातीमोल झालं होत. कालचक्रात निसर्ग सौदर्याचा पुजारी हरपला होता. त्यांच्या जाण्याने अवघा महाराष्ट्र हळहळला आणि मराठी साहित्य पोरकं झालं होतं.

ही घटना ऐकशे चार वर्षापूर्वीची. आपल्या २८ वर्षांच्या उण्यापु-या आयुष्यात केवळ १६३ कविता लिहून (४० प्रकाशित तर १२३ अप्रकाशित) मराठी साहित्यात ज्यांनी आपलं अढळ स्थान निर्माण केलं होतं त्या बलकवींची अर्थात त्र्यंबक बापूजी ठोमरे यांची स्मृती-शताब्दी होवून चार वर्षे झाली आहेत. औदुंबर, श्रावणमास, फुलराणी, आनंदी आनंद गडे, पारवा, तू तर चाफेकळी या कवितांनी रसिकांना भूरळच पाडली. त्यांचं गारुड आजही मराठी रसिकांच्या मनावरुन उतरलेलं नाही. प्राथमिक शाळेपासून ते थेट महाविद्यालयीन आणि विश्वविद्यालयीन अभ्यासक्रमात त्यांची कविता अभ्यासली गेली. अभ्यासली जात आहे. त्यांचा ‘औदुंबर’ अजूनही आपल्या गुढतेचं रहस्य स्वतःत दडवून आहे. अनेकांनी त्यांच्या कवितेवर पीएच.डी. केलंय. यातच त्यांच्या कवितेची वैश्विकता दडली आहे.

READ ALSO

धरणी नाल्याला संरक्षण कठळे लावण्याची मागणी तीव्र

धरणगावात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचे भव्य स्मारक व्हावे, महिलांचे मुख्याधिकाऱ्यांना निवेदन

बालकवींचा मृत्यू हा अपघात की आत्महत्या यावर खूप चर्चाही झाली. १९६२ ला मौज तर्फे प्रकाशित कृ.भा.मराठे यांच्या ‘बालकवी’ या ग्रंथात हा निव्वळ एक अपघात होता असं म्हटले आहे. तर १९६६ मध्ये प्रकाशित भा.ल.पाटणकर यांच्या ‘समग्र बालकवी’ या ग्रंथानुसार ती एक आत्महत्या होती असे म्हटले आहे. अपघात असो की आत्महत्या ? मराठी साहित्यासाठी व रसिकांसाठी तो काळाने त्यांचेवर उगवलेला एक सूड होता असं म्हटल्यास वावगे ठरणार नाही.

बालकवींचा जन्म १३ ऑगष्ट १८९० ला धरणगांवी झाला. येथील विठ्ठल पंत शुक्ल यांची कन्या गोदुबाई ह्या बालकवींच्या आई. त्यांचे वडील बापूजी देवराम ठोमरे हे येथेच फौजदार म्हणून नोकरीला होते. येथील जैन गल्लीतल्या त्यांच्या मातुलगृही त्यांचा जन्म झाला होता. पुढे ते एरंडोल, नगर, पुणे येथे जात येत राहीले. याच काळात त्र्यंबकने आईकडून भक्ती, काव्य, रसिकता आणि भावनिकता घेतली. जी पुढे त्यांच्या जगण्यात व काव्यातही वारंवार दिसून आली. १९०७ साली जळगावात भरलेल्या काव्यसंमेलनात रेव्ह.टिळक, कवी विनायक, नना फडणीस यांच्या उपस्थितीत व डाॅ.का.र.किर्तीकर यांच्या अध्यक्षतेखाली १७ वर्षीय त्र्यंबकने कविता म्हटली आणि सा-यांनी त्यांना ‘बालकवी’ पदवी बहाल केली. रेव्हरंट टिळकांकडे काही काळ वास्तव्य करुन, मिशनरी शाळेत शिक्षकाची नोकरी करुन ते काव्य लेखनासाठी पुन्हा खान्देशात परतले होते.

अपघात झाला त्या दिवशी ते त्यांची मोठी बहिण जिजींकडे भादलीला होते. त्या दिवशी त्यांचे जळगावचे मित्र आप्पा सोनाळकर यांची त्यांना एक तार आली. त्यात “आई आली रे भाऊ, आई आली. लवकर निघून ये !” असा निरोप होता. ही आई म्हणजे रमाई. जीच्याबद्दल बालकवींना एक वेगळेच आकर्षण होते. जीला ते कधीही भेटले नव्हते. मात्र जिच्या ठायी पत्नीचे सौदर्य व मातेची वत्सलता एकाच व्यक्तीमत्वात अनुभव घेतायेईल अशी ती त्यांची ध्येय देवता होती.(बालकवी-मौज, पृष्ठ ८८/८९). या रमाईची भेट एका उशिरा हाती पडलेल्या पत्रामुळे एकदा हुकली होती. त्याची हुरहुर त्यांना अस्वस्थ करी. त्या पत्राला बालकवींनी ‘स्वर्ग दारावरचे पारपत्र’ असे संबोधले होत. आज त्यांना ही भेट हुकू द्यायची नव्हती. ते जळगावला पोहचण्यासाठी भादली गावातून रेल्वे स्टेशनकडे निघाले. साधारण तीन मैलावर असलेल्या स्टेशनवर जाण्यासाठी ते पायवाटेने निघाले. स्टेशनच्या कॅबिन जवळ ते पोहचले. तेथल्या तार कुंपणातून रेल्वे रुळांजवळच्या अरुंद पायवाटेने आपल्याच तंद्रीत चालू लागले. स्टेशन समोर दिसत होते. भूसावल कडून येणारी गाडी शिटी वाजवत होती. गाडीचा आवाज, शिटीचा आवाज त्यांना जणू ऐकूच येत नव्हता. त्यांच्या डोक्यात काही वेगळाच विचार चालू होता. आडव्या तारा, रस्ता, पायवाट, खडी, फिशप्लेट त्यांच्या गावीही नव्हते. आणि रुळ ओलांडतांना त्यांच्या पायातला जोडा रुळात अडकला. भरधाव गाडी जवळ आली. आणि त्या अजस्त्र धुडाने त्या कोमल, सुकमार जिवाला धडामदिशी उडवले. त्या अंत्य समयी त्यांच्या विचारात पत्नी पार्वतीबाई होत्या की त्यांच्या ध्येय देवता रमाई ? हे कोडं कोडंच राहिलं . कधीही नं उलगडण्यासाठी. हे वृत्त जळगाव स्टेशनवर त्यांचे मित्र आप्पा सोनाळकरांना कळले. ते त्यांना न्यायलाच स्टेशनवर आले होते. ते तडक घटनास्थळी पोहचले. साश्रू नयनांनी त्यांनी छिन्नविछिन्न अवयव गोळा केले. बालकवीच्या सद-याच्या खिश्यात घड्याळ टिकटिक करत सुरू होते. बालकवींची एक कविता जणू ते गुणगुणत असावे.

घड्याळातला चिमणा काटा,
टिक टिक बोलत गोल फिरे.
हे धडपडते काळीज उडते,
विचित्र चंचल चक्र खरे !

बालकवींच्या जीवनाचं चक्र थांबले होते. मात्र, घड्याळाचे चक्र सुरुच होते. जणू काळ कुणासाठीही थांबत नाही हेच ते यातून सांगू पहात होते. काळ पुढे सरकत राहिला. शतक ओलांडून गेला. या काळावर बालकवीने लिहलेली अक्षरं पुसली गेली नाहीत. ती अमिट ठरली, अविट ठरली. ती आजही तळपत आहेत, लख्ख तेजाने. पिढ्यानपिढ्यांचं साहित्यिक मुल्य जपत.

बालकवींचा जन्म झाला ते धरणगांव आणि मृत्यू झाला ते भादली यात ४० किमी.चे अंतर आहे. राज्यातील आणि देशभरातून हजारो काव्य रसिक या ठिकाणी भेट देतात. मात्र, दुर्दैव असे की या दोन्ही ठिकाणी त्यांचं भव्य असं स्मारक नाही. धरणगांवी १२ कोटीचे स्मारक प्रस्तावित आहे. जे कोरोनामुळे रखडले आहे. तर, भादलीला बालकवींच्या जन्मशताब्दी निमित्त बनवलेले लहानश्या स्मारकाचे रेल्वेच्या विस्तारीकरणात नुतनीकरण झाले आहे. मराठी कवितेला ज्यांनी आपल्या हळव्या, सुंदर शब्दकळेने चंदेरी-सोनेरी साज चढविला त्यांच्या नशिबी जिवंतपणी आणि मृत्यूनंतरही अवहेलना यावी याहून मोठी शोकांतिका नाही. ही खंत त्यांच्या स्मृती-शताब्दी वर्षाततरी दूर झाली नाही ही काव्यप्रेमींची उपेक्षा. भविष्यात तरी त्यांच्या लौकिकाला साजेल असे बहुउपयोगी स्मारक लोकप्रतिनिधी प्रत्यक्षात साकारतील अशी आशा बाळगायला काय हरकत आहे.

© प्रा.बी.एन.चौधरी.
देवरुप, धरणगाव.
जि.जळगाव. ४२५१०५.
(९४२३४९२५९३)

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

धरणगाव

धरणी नाल्याला संरक्षण कठळे लावण्याची मागणी तीव्र

July 30, 2025
गुन्हे

धरणगावात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचे भव्य स्मारक व्हावे, महिलांचे मुख्याधिकाऱ्यांना निवेदन

July 29, 2025
जळगाव

प्रधानमंत्री सूर्यघर योजनेतील उत्कृष्ट कामगिरीसाठी महावितरणचा ‘बिझनेस टायटन्स’ पुरस्काराने सन्मान

July 29, 2025
धरणगाव

धरणगावात प्रथमच एटीएम मशिनद्वारे आरोग्य तपासणी शिबीर संपन्न !

July 27, 2025
धरणगाव

धरणगाव नगरपरिषदेची हरित क्रांती – पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते रोपवाटिका व बीज संकलन केंद्राचे उद्घाटन

July 27, 2025
भुसावळ

भुसावळ शहरात 2 ऑगस्ट रोजी ‘नवरत्नां’चा सन्मान

July 27, 2025
Next Post

'तो' निकाल फक्त ५ महापालिकांसाठी, इतर सर्व निवडणूका पावसाळ्यानंतरच होणार : विजय वडेट्टीवार !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

खान्देशात कृत्रीम पाऊस पाडण्यासाठी मुख्यमंत्र्यांना पत्र देणार : आ. गिरीश महाजन (व्हिडीओ)

August 9, 2021

मुलीच्या लग्नासाठी बस्ता बांधण्यासाठी जाताना जीप अपघात ; वधूपित्यासह दोन ठार

February 8, 2025

बापरे..लग्नाच्या ५ व्या दिवशीच नवऱ्याला सोडून चुलत भावासोबत पळाली नवरी !

February 12, 2022

महाराष्ट्र जीवन प्राधिकरण जळगाव नवीन मंडळ कार्यालयाचे सोमवारी पालकमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन

July 18, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group