जळगाव (प्रतिनिधी) येथील समता नगरात राहणाऱ्या ३३ वर्षीय तरुणाने राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. लॉकडाऊनमध्ये सूरत येथील खासगी बँकेतील नोकरी गमावली. नोकरी शोधली, मात्र ती मिळत नसल्याने तरूणाला नैराश्य आले होते. यातून तरुणाने टोकाचे पाऊल उचलले.
यासंदर्भात अधिक असे की, सुधीर नाना साळुंखे (वय ३३, रा. समतानगर) असे मृत तरुणाचे नाव आहे. जळगाव शहरातील सुधीर साळुंखे सूरत येथे एका खासगी बँकेत नोकरी करीत होता. कोरोना संसर्गामुळे लागू केलेल्या लॉकडाऊन काळात त्याची नोकरी गेली. यानंतर तो जळगावात येऊन आई-वडिलांसोबत राहत होता. लग्न झालेले असल्यामुळे पत्नी व दोन मुलांच्या संगोपनाची जबाबदारी त्याच्यावर होती. मात्र, नोकरी मिळत नसल्यामुळे गेल्या वर्षभरापासनू तो नैराश्यात होता. काल शनिवारी रात्री जेवण करुन तो खोलीत झोपण्यासाठी गेला. पहाटे पाच वाजता सुधीरने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे कुटुंबीयांच्या लक्षात आले. त्यांनी खाली उतरवून त्याला शासकीय वैद्यकीय महविद्यालय व रुग्णालयात दाखल केले. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी करून त्याला मृत घोषित केले. सुधीर याच्या पश्चात आई-वडील, पत्नी मोनाली, मुलगा सिद्धांत (दीड वर्षे), मुलगी पूर्वी (६ वर्षे), लहान भाऊ असा परिवार आहे.