TheClearNews.Com
Wednesday, August 19, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

“… तर आज कोरोनाच्या त्सुनामीत देशाला गटांगळ्या खाण्याची वेळ आली नसती” : शिवसेना

The Clear News Desk by The Clear News Desk
April 26, 2021
in राजकीय, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

मुंबई (वृत्तसंस्था) तज्ञांनी खूप आधी दिलेला इशारा गांभीर्याने घेतला असता आणि आता येईल ती ‘त्सुनामी’च असेल ही दुसऱ्या लाटेची ‘मन की बात’ वेळीच समजून घेतली असती तर आज कोरोनाच्या त्सुनामीत देशाला गटांगळ्या खाण्याची वेळ आली नसती अशी टीका शिवसेनेने केली आहे.

पंतप्रधान मोदी यांनी रविवारी ‘मन की बात’मधून कोरोनाची दुसरी लाट, त्याविरुद्ध केंद्र व राज्य सरकारे लढा देण्याचा पूर्ण प्रयत्न करीत असल्याबाबत ग्वाही दिली. ही लढाई सुरू आहे हे खरेच, पण ती सुरू होण्यापूर्वी केंद्राने काही गोष्टींची पूर्वखबरदारी, पूर्वतयारी केली असती तर? तज्ञांनी खूप आधी दिलेला इशारा गांभीर्याने घेतला असता आणि आता येईल ती ‘त्सुनामी’च असेल ही दुसऱ्या लाटेची ‘मन की बात’ वेळीच समजून घेतली असती तर आज कोरोनाच्या त्सुनामीत देशाला गटांगळय़ा खाण्याची वेळ आली नसती, अशी खोचक टीका शिवसेनेनं केली आहे.

READ ALSO

राष्ट्रवादी काँग्रेस शिक्षक सेलच्या अमळनेर शहराध्यक्षपदी उमाकांत हिरे

राष्ट्रवादी काँग्रेस व्यापारी आघाडी अमळनेर शहराध्यक्षपदी प्रकाश जैन

देशात गेल्या २४ तासांत सलग चौथ्या दिवशी तीन लाखांपेक्षा जास्त कोरोनाबाधितांची नोंद झाली तर २७६७ रुग्णांचा मृत्यू झाला. गेल्या आठवडय़ात २४ तासांतील कोरोना रुग्णवाढीचा दर दोन-अडीच लाखांच्या आसपास होता. गेल्या चार दिवसांपासून तीन लाखांच्या वर गेला आहे. दुसऱ्या कोरोना तडाख्याने सर्वच व्यवस्थांची अवस्था हतबल करून टाकली आहे. जसा कोरोना रुग्णवाढीचा रोज उच्चांक गाठला जात आहे, तसा मृत्यूचा आकडाही भयंकर प्रमाणात वाढत आहे. या पार्श्वभूमीवर अमेरिकेतील वॉशिंग्टन विद्यापीठाच्या इन्स्टिटय़ूट फॉर हेल्थ मेट्रिक्स ऍण्ड इव्हॅल्यूशनने दिलेला इशारा काळजाचा ठोका चुकविणाराच आहे. या संस्थेने काढलेल्या निष्कर्षानुसार मे महिन्यात भारतात रोजचा कोरोना मृतांचा आकडा पाच हजारांवर पोहोचू शकतो. १२ एप्रिल ते १ ऑगस्ट २०२१ या कालावधीत देशातील कोरोना मृतांची संख्या तीन लाखांच्या पार जाऊ शकते. वॉशिंग्टनच्या या संस्थेने दिलेला हा इशारा आता तरी केंद्र सरकारने गांभीर्याने घ्यायला हवा, असा सल्ला शिवसेनेनं दिला आहे.

गेल्यावर्षीही कोरोनाच्या पहिल्या लाटेच्या वेळी परदेशी संस्थांनी असे इशारे दिले होते. पण सुदैवाने परिस्थिती आटोक्यात राहिली होती. त्यामुळे या इशाऱयांबाबत सरकार समर्थक मंडळींकडून शेरेबाजीही करण्यात आली होती. मात्र सध्याची परिस्थिती तशी नाही हे सर्वांनीच लक्षात घेतले पाहिजे. कोरोनाची दुसरी लाट म्हणजे त्सुनामी ठरेल. या तज्ञांच्या इशाऱ्यांनाही गांभीर्याने घेतले नाही. त्याचाच परिणाम म्हणून आज नवे कोरोना रुग्ण आणि मृतांची संख्या याचे जागतिक विक्रम नोंदविले जात आहेत. ऑक्सिजनअभावी रुग्णांचे तडफडून मृत्यू होत आहेत. या सगळय़ाच परिस्थितीचे खापर फक्त कोरोनाच्या त्सुनामीवर फोडता येणार नाही, असेही यात म्हटले आहे.

आता सरकारतर्फे देशभरात ऑक्सिजनचा पुरवठा रेल्वेद्वारे केला जात आहे, त्यासाठी लष्कराचेही सहाय्य घेतले जात आहे. कोरोना लस, वैद्यकीय दर्जाचा प्राणवायू आणि त्याच्याशी संबंधित उपकरणे यांच्या सीमाशुल्कात सूट देण्याचाही निर्णय केंद्राने घेतला आहे. रेमडेसिवीरसारख्या अत्यंत तुटवडा जाणवणाऱ्या इंजेक्शनचाही पुरवठा सुरळीत करण्याचा प्रयत्न असल्याचे केंद्र सरकार सांगत आहे. हे सगळे ठीकच आहे, पण बेकाबू होऊ पाहणाऱ्या कोरोनाचे काय? हतबल झालेली आरोग्य व्यवस्था, उपचारांअभावी होणारे रुग्णांचे मृत्यू आणि त्यांच्या उद्ध्वस्त कुटुंबांचे काय? असा सवालही शिवसेनेनं केला आहे.

आग्रा येथील एक बातमी मन विषण्ण करणारी आहे. बेड न मिळाल्याने ऑक्सिजनअभावी तडफडणाऱया पतीला रिक्षातच आपल्या तोंडाने श्वास देऊन त्याचे प्राण वाचविण्याचे केविलवाणे प्रयत्न त्याची पत्नी करीत होती. ही बातमी कोरोनाबाबतच्या सर्वच सरकारी दाव्यांचा पर्दाफाश करणारी आहे. गेल्या वर्षी कोरोनाच्या पहिल्या लाटेत मैलोन्मैल पायपीट करीत आपल्या गावी निघालेले स्थलांतरितांचे लोंढे जगाला दिसले. आता कोरोनाच्या दुसऱया लाटेत आपल्या देशातील आरोग्य यंत्रणा पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळताना, ऑक्सिजन बेडअभावी कोरोना रुग्णांचे जीव जाताना जग पाहत आहे. हे सगळेच चित्र भयंकर आहे. सरकारकडून जे उपाय केले जात आहेत त्यामुळे भविष्यात कोरोना त्सुनामीचा प्रकोप कमी होईलही, पण तोपर्यंत ना गेलेले जीव परत येतील, ना त्यांची उद्ध्वस्त कुटुंबे सावरले जातील, असेही शिवसेनेनं यात म्हटले आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

अमळनेर

राष्ट्रवादी काँग्रेस शिक्षक सेलच्या अमळनेर शहराध्यक्षपदी उमाकांत हिरे

July 21, 2026
अमळनेर

राष्ट्रवादी काँग्रेस व्यापारी आघाडी अमळनेर शहराध्यक्षपदी प्रकाश जैन

July 16, 2026
जळगाव

पत्रकारांना धमकी प्रकरणी नशिराबाद पत्रकार संघ आक्रमक; खासदार संजय दिना पाटील यांच्याविरोधात कठोर कारवाईची मागणी

June 27, 2026
राज्य

मान्सून 15 जूननंतरच; तोपर्यंत महाराष्ट्रात उष्णतेचा तडाखा, पेरण्या रखडल्या

June 13, 2026
राजकीय

पायी रायगड चढत घेतले शिवरायांचे दर्शन

June 9, 2026
जळगाव

जळगाव विधान परिषदेसाठी चौरंगी लढत

June 5, 2026
Next Post

देशात कोरोनाचा प्रकोप सुरूच ; २४ तासांत तब्बल ३,५२,९९१ कोरोनाबाधितांची नोंद

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

संभाव्य टंचाईग्रस्त गावांतील कामे मिशन मोडवर करा ; पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांचे निर्देश !

August 24, 2023

सेवानिवृत्तीच्या उंबरठ्यावरील एका सहृदयी अधिकाऱ्याच्या मनाचा वेध घेणारे फिचर

May 2, 2024

धरणगाव पालिकेच्या माजी कर्मचाऱ्याला मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून आर्थिक मदत !

December 30, 2022

‘मी बोलले होते बॉलिवूड गटार आहे’ : कंगना रनौत

July 21, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group