TheClearNews.Com
Wednesday, September 30, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

लुनेश्वर भालेराव यांना ‘वर्ल्ड पार्लमेंट इंटरनॅशनल’ आंतरराष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित !

युनोत भारताला स्थायी सदस्यत्वासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार डॉ. मार्टिन

The Clear News Desk by The Clear News Desk
December 12, 2022
in धरणगाव, सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

धरणगाव (प्रतिनिधी) येथील हनुमान नगर परिसरातील रहिवाशी लुनेश्वर रघुनाथ भालेराव यांनी जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रात राबविलेल्या सामाजिक, शैक्षणिक, पत्रकारिता तसेच वैद्यकीय क्षेत्रात विविध उपक्रम घेत, उत्कृष्ट योगदान दिले आहे. त्यांनी ग्रामीण भागातून शिक्षण घेऊन विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन करत उच्चशिक्षित बनविले आहे. अश्या सर्व कार्याची दखल घेत श्रीरामपूर येथील खा.गोविंदराव आदिक सभागृहात वर्ल्ड कॉन्स्टिट्यूशन अँड पार्लमेंट असोसिएशन अर्थात, जागतिक संविधान व संसद संघ यांनी दखल घेऊन लुनेश्वर रघुनाथ भालेराव यांना डब्ल्यूसीपीए चे अध्यक्ष प्रा. डॉ. ग्लेन टी मार्टिन, उपाध्यक्ष प्रा.नरसिंहा मूर्ती, खजिनदार फिलिस टर्क, दिल्ली चॅप्टरचे अध्यक्ष डॉ.राकेश छोकर, राज्य संपादक संघ अध्यक्ष प्रकाश कुलथे, डब्ल्यूसीपीए महाराष्ट्र चॅप्टर अध्यक्ष प्रा.डॉ.दत्ता विघावे आदी मान्यवरांच्या हस्ते आंतरराष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

डॉ. दत्ता दिघावे यांनी प्रास्ताविकात संस्थेच्या कार्याची माहिती दिली. तत्पूर्वी भारतीय शास्त्रात व धर्मात अनन्यसाधारण महत्त्व असलेल्या तुळशीला जलार्पण करून उद्घाटन केले. तद्नंतर वर्ल्ड पार्लमेंट अध्यक्ष प्रा. डॉ. ग्लेन टी मार्टिन यांनी आपल्या भाषणात सांगितले की, जगाच्या एकूण लोकसंख्येच्या वीस टक्के लोकसंख्या भारताची असूनही संयुक्त राष्ट्र संघात भारताला कायम स्वरूपी सदस्यत्व नाही. संयुक्त राष्ट्रसंघाच्या उभारणीत भारताचा मोठा वाटा असून भारताला या प्रकारची सापत्न वागणूक मिळणे हा एक प्रकारचा भारतावर अन्यायच आहे. शिवाय मोजक्या पाच देशांना व्हेटोचा अधिकार असल्याने इतर सदस्य देशांचा या संघटनेत समावेश असणे म्हणजे असूनही नसल्यासारखीच अवस्था असल्याचे प्रतिपादन मार्टिन यांनी केले. उपाध्यक्ष मुर्ती यांनी वर्ल्ड पार्लमेंट भारताच्या राज्यघटनेचा सर्वतोपरी आदर, सन्मान व पालन करून आपले मार्गक्रमण करील असे स्पष्ट केले.

READ ALSO

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 30 सप्टेंबर 2026 !

मतदार यादी पुनरीक्षणाबाबत राजकीय पक्षांसोबत बैठक

खजिनदार फिलीस टर्क यांनीही डब्ल्यूसीपीविषयी माहिती दिली. याप्रसंगी दिल्ली चॅ.अध्यक्ष डॉ. छोकर, म.रा.सं.संघ अध्यक्ष प्रकाश कुलथे यांनीही डब्ल्यूसीपीएच्या कार्याचा गौरव केला. अध्यक्षीय सूचना प्रा. सुलावळे यांनी तर अनुमोदन प्रा.अरुण सावंग यांनी केले. “अर्थ कॉन्स्टिट्यूशन” ह्या मुळ इंग्रजी ग्रंथाचे मराठी आवृत्ती चे प्रकाशन, व वसुधा नाईक यांच्या “शब्द फुलांची ओंजळ” पुस्तकाचे प्रकाशन तर, बॅग, पॅड, व स्लॅशचे अनावरण करण्यात आले. कोणत्याही भारतीय भाषेत या संविधान ग्रंथाचे भाषांतर करण्याचा मान मराठी भाषेला प्रथम मिळाला. डॉ. विघावे यांच्या अध्यक्षतेखाली ठाणे येथील प्रा.नागेश हुलावळे, डॉ.प्राची बामणे, प्रा.ॲड. तेजल वैती यांनी अनुवादन केले. याप्रसंगी डॉ. सीमा वाघेला डॉ.अलका नाईक, प्रल्हाद घोरबंड, शाहिस्ता परवीन खान, तुकाराम निमगिरे, संगीता जामगे, राहुल मघाडे, लुनेश्वर भालेराव, यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. आकाशवाणीचे नैमित्तिक उद्घोषण प्रसन्नकुमार धुमाळ यांनी मराठीत व आदिनाथ जोशी यांनी इंग्रजीत सूत्रसंचालन केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी डॉ.विघावे यांसह सचिव प्रा.अरुण सावंग, सहसचिव ऋषिकेश विघावे, खजिनदार चिंतामण भोसले, अक्षय तेलोरे, पवन लांबोळे, अकबर सय्यद, यांनी महत्त्वाचे योगदान दिले. धरणगाववासी श्री.भालेराव यांना आंतरराष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित केल्याबद्दल त्यांचे शहर व परिसरातील राजकिय, सामाजिक, शैक्षणिक, पत्रकार व विविध स्तरातून त्यांचे सर्वत्र अभिनंदन केले जात आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 30 सप्टेंबर 2026 !

September 30, 2026
जळगाव

मतदार यादी पुनरीक्षणाबाबत राजकीय पक्षांसोबत बैठक

September 29, 2026
जळगाव

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 29 सप्टेंबर 2026 !

September 29, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 28 सप्टेंबर 2026 !

September 28, 2026
सामाजिक

Weekly Horoscope साप्ताहिक राशीभविष्य 27 सप्टेंबर ते 03 ऑक्टोंबर 2026 !

September 27, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 26 सप्टेंबर 2026 !

September 26, 2026
Next Post

खळबळजनक : जळगावात बेपत्ता तरुणाचा खून ; कुजलेल्या अवस्थेत आढळला मृतदेह !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

Today Horoscope : आजचे राशिभविष्य, ५ ऑगस्ट २०२४ !

August 5, 2024

गिरीश महाजनांच्या वाहनाची दुचाकीला धडक ; एकाची प्रकृती गंभीर !

September 27, 2020

वैज्ञानिक दृष्टिकोनासह, रोगमुक्त रोपांना प्राधान्य द्यावे- डॉ. अशोक धवन

December 22, 2025

विधानसभेलाच्या वेळीच माझ्याकडे राष्ट्रवादीचा एबी फॉर्म तयार होता : खडसे

October 22, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group