भुसावळ (प्रतिनिधी) तुमच्या दोघं मुलांना रेल्वे विभागात नोकरीस लावून देतो असे खोटे अमीष दाखवून वृद्धाची ९ लाख ६५ हजारांची फसवणूक केल्याप्रकरणी भुसावळ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रकाश हरीचंद्र सोनवणे (रा.सोमेश्र्वर नगर भुसावळ), असे संशयित आरोपीचे नाव आहे.
यासंदर्भात अधिक असे की, जुलै २०१९ ते हून २०२३ पावेतो वेळोवेळी प्रकाश सोनवणे याने विश्वास व्यकटेश वालवडकर (वय – ६१ धंदा रिटायंट रा.दिवेश हाईट भुसारआळी, कळवा ठाणे) यांना तुमचा मुलगा व्यंकटेश व प्रतीक वालवडकर यांना रेल्वे विभागात नोकरीस लावून देतो, असे खोटे अमीष दाखवले. नौकरी लावण्यासाठी वालवडकर यांच्याकडून वेळोवेळी ९ लाख ६५ हजार स्वीकारले. नौकरी कधी लागेल, याची विचारणा केली असता उडवा उडवीची उत्तरे दिली. तसेच सेंट्रल रेल्वेच्या नावाने बनावट व खोटी कागदपत्रे तयार करून ते वालवडकर यांना देवून फसवणूक केली. या प्रकरणी भुसावळ शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पो. उपनिरी दिलीप चौधरी हे करीत आहेत.