जळगाव (सुरेश उज्जैनवाल) सरकारी अथवा निम सरकारी नोकरीतील सेवा काळ हा निवृत्ती पर्यतच असतो. आपल्या सेवा काळात कोणी किती सचोटीने व निष्ठा पूर्वक आपलं कर्तव्य बजावलं याच्या हिशोबाचा दिवस म्हणजे सेवानिवृत्ती.
ही प्रस्तावना मांडण्याच कारण एवढं च की, जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे सरव्यवस्थापक पदावरून एम.टी. चौधरी हे नुकतेच सेवा निवृत्त झाले. सेवा निवृत्त झाल्या बद्दलचा मेसेज त्यांनी पत्रकार म्हणून मला पाठविला. त्यात त्यांनी सेवा काळात दाखविलेला विश्वास व स्नेह या बद्दल आभार ही व्यक्त केले आहे. एम.टी. चौधरी यांची जिल्हा बँकेत अभियंता म्हणून सुरू झालेली सेवा अधिकारी ते सरव्यवसथापक असा 35 वर्षांचा सेवा प्रवास आहे.
पत्रकार म्हणून वृत्त संकलनाचे काम करीत असताना त्यांच्याशी परिचय झाला. प्रसंगी ज्या ज्या वेळी बँकेत येणे व्हायचे त्या वेळी त्यांच्याशी भेट व्हायची. श्री चौधरी यांचा स्वभाव साधा सरळ आणि आपल्या कर्तव्याप्रति पूर्णपणे समर्पित असल्याचा अनुभव आला. बँकेच्या हिता सह शेतकऱ्यांच्या बाबतीत ही तेवढीच आत्मतीयता दिसून यायची. बँकेचे संचालक मंडळ तसेच अध्यक्षाच्या पसंतीचे अधिकारी म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात होते. आपल्या स्वभावाने तसेच कर्तव्य तत्परतेने त्यांनी आपला वेगळा ठसा बँकेत निर्माण केला. आपल्या अधिकारिपणाचा जरासा ही लवलेश या व्यक्तीत कधी दिसून आला नाही. अशा या सौहार्दपूर्ण व्यक्तिमत्वास भावी वाटचालीस शुभेच्छा…!
….सुरेश उज्जैनवाल, ज्येष्ठ पत्रकार जळगाव
















