संभाजीनगर (प्रतिनिधी) तितिक्षा इंटरनॅशनल पुणे आयोजित तितिक्षा साहित्यकला संमेलन-२०२४, शनिवारी छत्रपती संभाजीनगर येथे घेण्यात आले. यात जळगाव येथील कवियत्री माधुरी प्रशांत भट यांना स्वरचित चारोळी व दोन स्वरचित कविता यासाठी मान्यवरांच्या हस्ते तीन पारितोषिक व रोख बक्षीस देवून सन्मानित करण्यात आले.
संमेलनाचे उदघाटन संभाजीनगर च्या विद्यमान धर्मदाय उपायुक्त सौ.प्रमिलाताई श्रीनिवार , हॅपी सायन्स संस्थेचे पश्चिम आशिया अध्यक्ष श्री.कोटा नागुची (जपान),ज्येष्ठ साहित्यिक फ.मु.शिंदे, जेष्ठ साहित्यिका सौ.छाया महाजन, जेष्ठ साहित्यीक श्री.भवान महाजन, श्री.व सौ.सतीश इंदापूरकर(जेष्ठ दिग्दर्शक),श्री व सौ.प्रशांत होर्षिळ (T. V.सिरीयल निर्माता-दिग्दर्शक ) ,जेष्ठ दिग्दर्शक , नाटककार, शिळवादक ,लेखक,गायक श्री.,मधू घाणेकर , सौ.प्रियाताई दामले (तितिक्षा प्रतिष्ठान), सौ.सुनीताताई कावसानकर(संपादिका-युगंधर प्रकाशन) ह्यांचे हस्ते ही पारितोषिक व पुरस्कार प्रदान करण्यात आले.
असे आहेत पुरस्कार :-
१.तितिक्षा इंटरनॅशनल,पुणे, आयोजित गुरू काव्य लेखन करंडक स्पर्धेत माझ्या स्वरचित काव्यास सर्वोत्कृष्ट काव्य -प्रथम क्रमांकाचा पुरस्कार मिळाला. करंडक, सन्मानचिन्ह, सन्मानवस्त्र(शाल), देऊन गौरविण्यात आले.
२.आज झालेल्या आंतरराष्ट्रीय साहित्य संमेलनात संभाजीनगर येथे झाले त्यावेळी माझ्या स्वरचित समाधान या काव्यरचनेस द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक प्राप्त झाले.
सन्मान वस्त्र, सन्मान चिन्ह, रोख रक्कम (501/-), तसेच काव्यसंग्रह देऊन सन्मानित करण्यात आले. उत्कृष्ट काव्यवाचनाबद्दल विशेष सन्मान चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला
३.तितिक्षा इंटरनॅशनल , पुणे आयोजित स्व.सुहासिनीताई प्रमोद दामले यांच्या ७७व्या जयंती निमित्त घेण्यात आलेल्या तितिक्षा चारोळी स्पर्धेत आई ह्या विषयावर स्वरचित चारोळीला सौ.माधुरी प्रशांत भट(श्रीमती माधुरी सुमंतराव कुळकर्णी) यांना उत्तेजनार्थ पारितोषिक प्राप्त झाले. त्यात सन्मानचिन्ह, सन्मान वस्त्र देऊन सन्मानित करण्यात आले.