धरणगाव (प्रतिनिधी) पी. एम. पाटील यांची निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार प्रदेशाध्यक्ष बी. जे. देशमुख साहेब यांनी केला. महाराष्ट्र ग्रंथालय सेनेची यादी सेना भवन येथून सामना वृत्तपत्रात शिवसेना पक्ष प्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या आदेशान्वये खासदार सुभाष देसाई यांनी प्रसिद्धी केली.
जळगाव जिल्ह्यातील धरणगाव येथील वाचनालयाचे अध्यक्ष पी. एम. पाटील यांची शिवसेना प्रणित ग्रंथालय सेनेच्या प्रदेश उपप्रमुख पदी निवड करण्यात आली आहे. त्यांच्या या निवडीबद्दल प्रदेशाध्यक्ष बी. जे. देशमुख साहेब यांनी त्यांच्या निवडीबद्दल सत्कार केला. या प्रसंगी जिल्हा ग्रंथालय सेना प्रमुख डॉ प्रशांत पाटील, एस.टी. जावळे, दिलीप पाटील जामनेर व पदाधिकारी उपस्थित होते. असे प्रसिद्धी पत्र योगेश पाटील यांनी दिले आहे.