अमळनेर (प्रतिनिधी) येथे महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळातर्फे रस्ता सुरक्षा सप्ताह कार्यक्रम अमळनेर येथील बस आगारात संपन्न झाला.
यावेळी प्रमुख अतिथी प्रा. जयश्री दाभाडे प्रदेशाध्यक्षा आदिवासी एकता संघर्ष समिती, महा प्रदेश, खान्देश शिक्षण मंडळाचे अध्यक्ष नीरज अग्रवाल हे उपस्थित होते. यावेळी महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाचे उप महाव्यवस्थापक माधव देवधर, सोनवणे यंत्र अभियंता जळगाव, अर्चना भदाणे अमळनेर आगार व्यवस्थापक, पंकज साळुंके अभियंता, अमळनेर आगार आदी उपस्थित होते. यावेळी प्रमुख अतिथी प्रा. जयश्री दाभाडे यांनी देशात सर्वाधिक अपघात म्हणजेच ९०% हे मानवी चुका मुळे होतात. खूप कमी म्हणजे १०%अपघात हे तांत्रिक अडचणी किंवा बिघाड झाल्याने होतात. तसेच सर्वाधिक विश्वास हा लाल परीच्या चालकांवर व कंडक्टर यांच्यावर जनतेचा असतो. त्यामुळे स्त्रिया, तरुणी विश्वासाने प्रवास करू शकतात. देशात अपघातांचे प्रमाण अधिक असून जागतिक पातळीवर भयंकर अपघातांच्या आकडेवारीत भारताचा क्रमांकवर येतो. चालकांनी नियमांचे पालन करून वाहन चालवावे कारण स्वतः च्या कुटुंबा बरोबरच प्रवाशांच्या कुटुंबाचीही जबाबदारी त्यांच्यावर असते. असे प्रतिपादन केले. खान्देश शिक्षण मंडळाचे अध्यक्ष नीरज अग्रवाल यांनी आपल्या मनोगतातून चालकांनी दररोज व्यायाम करणे, योग साधना करणे आवश्यक आहे. कारण वाहन चालविण्यासाठी मनाची आणि शरीराची तंदुरुस्ती आवश्यक असते असे दाभाडे यांनी म्हटले.
आपल्या अध्यक्षीय भाषणात माधव देवधर उप व्यवस्थापक मुंबई यांनी बस वाहन चालकांना आपल्या जबाबदाऱ्याची जाणीव करून देत अमळनेर आगाराचे काम अत्यन्त उत्कृष्ट आहे. सर्व उत्कृष्ट कार्य करणाऱ्या वाहन चालकांचा योग्य तो सन्मान केला जातो. त्यामुळे सर्वांनी सडक सुरक्षा.. जीवन रक्षा या तत्वाचे पालन करत कार्य करावे असे मार्गदर्शन जयश्री दाभाडे यांनी केले. यावेळी ढिवरे यांनी कविता सादर केली. याप्रसंगी मोठ्या प्रमाणात बस आगारातील चालक, कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी पंकज साळुंके आणि इतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.