बोदवड (प्रतिनिधी) राष्ट्रीय काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांची खासदारकी रद्द केल्याच्या निषेधार्थ बोदवड येथे महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी मलकापूर चौफुलीवर रास्ता रोको केला आणि सरकारविरुद्ध घोषणाबाजी केली.
यावेळी भुसावळ पंचायत समिती माजी सभापती विरेंद्रसिंग पाटील,जिल्हा उपाध्यक्ष सागर पाटील,बोदवड पंचायत समिती माजी सभापती तालुका काँग्रेस अध्यक्ष भारत पाटील,काँग्रेस शहर अध्यक्ष शेख मेहबूब शेख चांद,कोल्हाडी लोकनियुक्त सरपंच पुंजाजी पाटील,माजी नगरसेवक डॉ सुधीर पाटील, काँग्रेस सेवादल अध्यक्ष विनोद मायकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष आबा पाटील,शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे तालुकाप्रमुख गजानन खोडके,राष्ट्रवादी शहर अध्यक्ष प्रदीप बडगुजर, नगरसेवक दिपक झांबड,बोदवड माजी सरपंच कैलास चौधरी,नगरसेवक भरत पाटील,सुभाष पालवे, दिलीप पाटील, समाधान पाटील, आसिफ भाई,प्रमोद धामोडे,सम्राट पाटील, अशोक तायडे, रवींद्र खेवलकर आदी कार्यकर्ते उपस्थित होते. आंदोलन शांततेत पार पडले.