अमळनेर (प्रतिनिधी) महाराष्ट्र माळी समाज महासंघाची बैठक येथील क्षत्रिय माळी समाज पंच मंडळ मढीत संपन्न झाली. यावेळी महाराष्ट्र माळी समाज महासंघची अमळनेर तालुका कार्यकारिणीची निवड करण्यात आली. तर महाराष्ट्र माळी समाज महासंघच्या अमळनेर तालुकाअध्यक्षपदी महेंद्र सुदाम महाजन यांची निवड करण्यात आली.
या बैठकीस महाराष्ट्र माळी समाज महासंघाचे प्रदेशाध्यक्ष शालिकराम मालकर, जिल्हाध्यक्ष शामराव पाटील, डॉ नलिन महाजन, भास्कर पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली. जिल्हा अध्यक्ष शामराव पाटील यांनी २८ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या महाराष्ट्र माळी समाज महासंघाच्या वधू-वर परिचय मेळाव्यास उपस्थित राहण्याचे व जास्त जास्त परिचय पत्र जमा करण्याचे आव्हान केले. तसेच महाराष्ट्र माळी समाज महासंघची अमळनेर तालुका कार्यकारिणीची निवड करण्यात आली. त्यात जिल्हा प्रज्ञावंत आघाडीच्या उपाध्यक्षपदी मनोहर भगवान महाजन यांची निवड करण्यात आली तर महाराष्ट्र माळी समाज महासंघच्या अमळनेर तालुका अध्यक्षपदी महेंद्र सुदाम महाजन, तालुका उपाध्यक्ष-योगेश रघुनाथ महाजन, युवक तालुकाध्यक्षपदी आकाश डी माळी, प्रज्ञावंत आघाडी तालुका अध्यक्षपदी साखरलाल शांताराम महाजन यांची निवड सर्वानुमते करण्यात आली. यावेळी निवडीचे पत्र अमळनेर माळी समाजाचे अध्यक्ष गंगाराम निंबा महाजन, उपाध्यक्ष गुलाब ओंकार महाजन, एडवोकेट सुदाम श्रावण महाजन, ना म महाजन, बी आर महाजन, नगरसेवक देविदास भगवान महाजन, मेडिकलचे संचालक प्रवीण महाजन समता परिषदचे शहराध्यक्ष प्रताप पाटील यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आले.
यावेळी प्रशांत महाजन प्रवीण महाजन बडगुजर यासह समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. नितीन चव्हाण यांनी तर आभार महाराष्ट्र माळी महासंघाचे जिल्हा कार्याध्यक्ष भीमराव महाजन यांनी मानले.