धरणगाव (प्रतिनिधी) महसूल विभागाने सोमवारी रात्री तहसीलदार संवर्गातील काही अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. त्यानुसार धरणगावला नवीन तहसीलदारपदी महेंद्र सूर्यवंशी यांच्या नियुक्तीचे आदेश काढण्यात आले आहेत.
सोमवारी रात्री निघालेल्या आदेशानुसार मुक्ताईनगरच्या तहसीलदार श्वेता संचेती यांची त्र्यंबकेश्वर येथे बदली झाली आहे. त्यांच्याजागी डी. एल. मुकुंदे यांची नियुक्ती झाली आहे. भुसावळचे तहसीलदार दीपक धिवरे यांची मालेगाव येथे धान्य वितरण अधिकारी म्हणून, तर त्यांच्या जागी प्रशांत सांगळे यांची आणि जामनेरचे अरुण शेवाळे यांची धुळे ग्रामीण तहसीलदारपदी नियुक्ती करण्यात आली आहे. दरम्यान, गेल्या दीड महिन्यात झालेल्या बदल्यांनंतर ८ पैकी ५ अधिकारी रुजू झाले होते. त्यातच भुसावळ व मुक्ताईनगर तहसीलदारपदही रिक्त झाले आहे.
राज्यातील तहसीलदारांच्या बदल्यांसोबतच नंदुरबार निवडणूक उपजिल्हाधिकारी संजय बागडे यांची सचिव (गानिए / स सप्र ) नंदुरबार, तर नंदुरबारचे पुनर्वसन अधिकारी नितीन सदगीर यांची मालेगाव प्रांत, तर धुळे रोहयो उपजिल्हाधिकारी नितीन गावंडे यांची धुळे निवासी उपजिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती झाली.