मुंबई (वृत्तसंस्था) राज्य राखीव पोलीस बल नागपूर गट क्र. ४ येथे लवकरच सातवी पास उमेदवारांच्या काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. भोजन सेवक या पदांसाठी ही भरती (Police bharti Maharashtra) असणार आहे. या पदासाठी लागणारी शैक्षणिक अर्हता, वयोमर्यादा, अनुभव, अर्जाची शेवटची तारीख यांचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत.
या पदांसाठी भरती
भोजन सेवक – एकूण जागा ०८
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव
भोजन सेवक : या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी इयत्ता सातवीपर्यंत शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांना शासनानं मान्यता दिलेल्या किंवा प्राधिकरणातंर्गत येणाऱ्या शाळेतून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना भोजनाशी निगडित सर्व कामांचा अनुभव असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित कामाचा अनुभव असणं आवश्यक आहे.
वयोमर्यादा
या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांचं वय १८ ते ३८ वर्षांच्या दरम्यान असणं आवश्यक आहे. तसंच मागासवर्गीयांसाठी पाच वर्षांची सूट देण्यात आली आहे.
इतका मिळणार पगार
या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांना १५,००० रुपये प्रतिमहिना ते ४७,६०० रुपये प्रतिमहिना इतका पगार दिला जाणार आहे. उमेदवारांचा पगार हा त्यांच्या मुलाखतीवर किंवा अनुभवावर अवलंबून असणार आहे.
भरती शुल्क
भोजन सेवक : खुल्या प्रवर्गासाठी – ३००/- रुपये, मागासवर्गीयांसाठी – १५०/- रुपये
ही कागदपत्रं आवश्यक
Resume (बायोडेटा)
दहावी, बारावी आणि इंजिनिअरिंगची शैक्षणिक प्रमाणपत्रं
शाळा सोडल्याचा दाखला
जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)
ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स)
पासपोर्ट साईझ फोटो
अर्ज करण्यासाठीचा पत्ता
समादेशक, राज्य राखीव पोलीस बल गट क्र. ०४, हिंगणा रोड, नागपूर
अर्ज करण्याची शेवटची तारीख – २८ जानेवारी २०२२