भुसावळ (प्रतिनिधी) तालुक्यात झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले असून महसूल व कृषी विभागाने या नुकसानीचे तत्काळ पंचनामे करण्याचे निर्देश करावे, अशी सूचना आ. संजय सावकारे यांनी दिली आहे.
तहसील कार्यालयात सोमवारी तहसीलदार दीपक धिवरे, तालुका कृषी अधिकारी अभिनव माळी यांच्यासह मंडळ अधिकारी, कृषी सहाय्यकांची बैठक घेण्यात आली. त्यात १२ गावांमधील १८४ हेक्टरवरील पिकांच्या नुकसानीचे पंचनामे झाल्याची माहिती मिळाली. तालुक्यात कोठेही अतिवृष्टी झालेली नाही, असा दावा अधिकाऱ्यांनी केला. मात्र, तांत्रिकदृष्ट्या अतिवृष्टी नसली तरी पावसामुळेच तालुक्यात शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. यामुळे सर्व गावांमध्ये दोन दिवसांत पंचनामे करावे. लवकर मदत कशी मिळेल, असे प्रयत्न करावे, असे आमदार सावकारे म्हणाले.