एरंडोल (प्रतिनिधी) मोटरसायकल चोरीतील फरार असलेल्या संशयीताला गावठी बनावटीचा पिस्तुलासह जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सोमवारी १९ ऑगस्ट रोजी दुपारी २ वाजता एरंडोल शहरातून अटक केली आहे त्याच्यावर मोटरसायकल चोरीचे गुन्हे दाखल आहेत अशी माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांनी सायंकाळी ५ वाजता घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली आहे. प्रवीण रवींद्र बागुल (वय २०, रा. केवडीपुरा ता. एरंडोल), असे अटक केलेल्या संस्थेत आरोपीचे नाव आहे.
एरंडोल शहरात संशयित प्रवीण बागुल हा कमरेला गावठी पिस्तूल लावून चोरीच्या दुचाकीवरून फिरून शहरात दहशत माजवीत असल्याची गोपनीय माहिती जळगाव येथील स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस कॉन्स्टेबल नंदलाल पाटील आणि पोलीस नाईक भगवंत पाटील यांना मिळाली. त्यानुसार पथकाने सोमवारी १९ ऑगस्ट रोजी दुपारी २ वाजता संशयित आरोपी प्रवीण बागुल याला अटक केले. त्याच्याकडून चोरीची दुचाकी आणि गावठी पिस्तूल जप्त केले आहे. त्याच्या संदर्भात अधिक चौकशी केली असता त्याच्या विरोधात एरंडोल पोलीस ठाण्यात दोन दुचाकी चोरीचे गुन्हे दाखल आहेत, तेव्हापासून तो फरार होता. अशी माहिती पोलीस अधीक्षक महेश व रेड्डी यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक राहुल तायडे, गणेश वाघमारे दत्तात्रय पोटे, पोलीस हवालदार नंदलाल पाटील, भगवान पाटील, राहुल बैसाने, राहुल कोळी, रवी कापडणे आणि चालक महेश सोमवंशी यांनी केली आहे. पुढील कारवाईसाठी संशय आरोपीला एरंडोल पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.