चाळीसगाव (प्रतिनिधी) पाच वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या आरोपीस नैसर्गिक मृत्युपर्यंत जन्मठेपेची शिक्षा व ५ हजार रुपये दंड अतिरिक्त सत्र न्यायालयाने ठोठावला आहे. संदीप सुदाम तिरमली (वय ३६ वर्षे, रा. शिरसगाव, ता. चाळीसगाव) असे आरोपीचे नाव आहे.
यासंदर्भात अधिक असे की, दिनांक ३ जानेवारी २०२१ रोजी रात्री ७.३० ते ८.०० वाजेच्या दरम्यान पिडीता ही तिच्या मैत्रिणीसोबत अंगणात खेळत असतांना आरोपी संदीप सुदाम तिरमली (वय ३६ वर्षे, रा. शिरसगांव, ता. चाळीसगाव, जि. जळगाव) याने पिडीता हीस खाऊ देण्याचे आमिष दाखवून तो राहत असलेल्या घरी बोलावले. त्यानंतर पिडीतेला खाऊ घेण्यासाठी १० रुपयाच्या ३ नोटा देऊन तिच्यावर बळजबरीने शारिरीक अत्यावर केला. त्यानंतर पिडीत मुलगी ही रडत रडत घरी आली, तेव्हा तिच्या हाताच्या मुठीत १० रुपयाच्या ३ नोटांना रक्ताचे डाग होते. यानंतर सर्व हकीगत घरी सांगितली. त्यानंतर कुटुंबीयांनी दिनांक ०४ जानेवारी २०२१ रोजी मेहुणबारे पो.स्टे. येथे आरोपीविरुध्द फिर्याद दाखल केली. त्याअनुषंगाने पोलीसांनी गु.र. क. २/२०२१. भा.द.वि. कलम ३७६ (२) (आय), ३७७ आणि बा. ले.अ.प्र. अधिनियम २०१२ चे कलम ४,६,८,१२ नुसार तक्रार नोंदविली.
सदर खटल्याची सुनावणी अतिरिक्त सत्र न्यायाधीश डी. एन. खडसे यांच्या न्यायालयासमोर झाली. त्यात शासकिय अभियोक्ता अॅड.केतन ढाके यांनी एकूण ६ साक्षीदार तपासले. यात फिर्यादी, पिडीतेचे वडील, पंच साक्षीदारांची साक्ष तपासणी अंमलदार व डॉक्टरांची साक्षी खुप महत्वपूर्ण ठरल्या. तसेच सदर कामातील तपासी अधिकारी हेमंत शिंदे यांनी योग्यप्रकारे काम केल्यामुळे तसेच सरकारपक्षातर्फे करण्यात आलेला प्रभावी युक्तीवाद न्यायालयाने ग्राहय धरत आरोपीस भा.दं.वि. कलम ३७६ (२) (जे), ३७६ऐवी आणि बा.ले. अ.प्र.अधिनियम २०१२ चे कलम ३ व ५ अन्वये दोषी धरून खालीलप्रमाणे शिक्षा ठोठावली
अशी आहे शिक्षा !
भा.द.वि. कलम ३७६(२) (जे) साठी १० वर्षाची सश्रम कारावासाची शिक्षा व रुपये १,०००/- दंड. भा.द.वि. कलम ३७६ऐवी साठी आजन्म कारावासाची शिक्षा व रुपये २,०००/- दंड. बा.लै. अ.प्र अधिनियम २०१२ चे कलम ३ साठी ७ वर्षाची सश्रम कारावासाची शिक्षा व रुपये १,०००/- दंड. बा.लै.अ.प्र अधिनियम २०१२ चे कलम ५ साठी १० वर्षाची सश्रम कारावासाची शिक्षा व रुपये १,०००/- दंड.
७ वर्षांची शिक्षा भोगुन आल्यानंतर पुन्हा दुसरा गुन्हा
संदीप तिरमली या आरोपीने यापूर्वी मेहुणबारे पो.स्टे. येथील गु.र.नंबर ४६/२०१२ अन्वये भा.द.वि. कलम ३७६ च्या गुन्हयामध्ये ७ वर्षांची शिक्षा भोगुन आल्यानंतर पुन्हा दुसरा गुन्हा केला आहे. याकामी सरकार पक्षातर्फे शासकीय अभियोक्ता केतन जे. ढाके यांनी साक्षीदारांच्या साक्षी नोंदवून प्रभावी युक्तिवाद केला. तसेच ५ वर्ष वयाच्या लहानग्या मुलीसोबत केलेले कृत्य हे समाजात नात्यांच्या व माणुसकीच्या छवीला काळीमा फासणारे आहे, असाही युक्तिवाद केला. न्यायालयासमोर आलेले पुरावे व प्रभावी युक्तिवाद यामुळे न्यायालयाने आरोपी यास दोषी धरले आहे. याकामी पैरवी अधिकारी देविदास कोळी तसेच केस वॉच दिपक महाजन यांनी सहकार्य केले.
















