जळगाव (प्रतिनिधी) पिंक ऑटो या व्यवसायात जास्तीत जास्त महिलांनी सहभागी व्हावे या करीता मराठी प्रतिष्ठानतर्फे पिंक ऑटो प्रशिक्षण शिबीर सुरू करण्यात येत आहे. शहरासह जिल्ह्यातील महिलांनाही पिंक ऑटो प्रशिक्षण घेण्याकरीता निवास व भोजन व्यवस्थेसह प्रशिक्षण देणार असल्याची माहिती मराठी प्रतिष्ठानचे अध्यक्ष अॅड. जमील देशपांडे यांनी दिली आहे.
प्रशिक्षण कालावधी दहा दिवसांचा असणार आहे. बँकेकडून ८५% कर्ज उपलब्ध करून दिले जाणार आहे. लायसन्स बॅच, परमीट, प्रशिक्षण याकरीता नाममात्र शुल्क आकारले जाणार असुन निवास व भोजन व्यवस्था निशुल्क आहे. पिंक ऑटो प्रशिक्षण करीता २० फेब्रुवारी पासुन नांव नोंदणी करता येणार आहे. आधार कार्ड, जन्म तारखेचा दाखला, पॅन कार्ड, २ पासपोर्ट साईज फोटोसह मराठी प्रतिष्ठानच्या गणपती नगर कार्यालयात संपर्क करावा. निवास, भोजन व प्रशिक्षण याबाबत मराठी प्रतिष्ठानचे सचिव विजय वाणी, उपाध्यक्ष सतिष रावेरकर, महिला आगाडी अध्यक्ष अनुराधा रावेरकर, संध्या वाणी, निलोफर देशपांडे, डॉ. सविता नंदनवार यांच्याशी संपर्क साधावा असे मराठी प्रतिष्ठानने कळविले आहे.