यावल (प्रतिनिधी) कौटुंबिक वादातून तालुक्यातील महेलखेडी-कोरपावली येथील एका विवाहितेने विषारी द्रव्य प्राशन करून आत्महत्या केली.
तालुक्यातील महेलखेडी कोरपावली येथील विवाहित नजमा कासम तडवी (वय-३०) हिने गुरुवारी आपल्या कुटुंबात झालेल्या भांडणानंतर संतापाच्या भरात विष प्राशन केले. त्यानंतर तिला तात्काळ कुटुंबीयांनी पुढील उपचारासाठी डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले. परंतू शुक्रवारी उपचार सुरु असतांना विवाहितेने मृत्यू झाला. या संदर्भात यावल पोलीस स्टेशनमध्ये या घटनेची अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे.