TheClearNews.Com
Thursday, March 26, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

जनसंवाद यात्रेच्या समारोपाला स्वतः येणार ; अजितदादा पवारांकडून रोहिणीताई खडसेंचं कौतुक !

रोहिणीताई खडसेंच्या जनसंवाद यात्रेचा उपक्रम इतरांनी सुद्धा आपल्या मतदारसंघात राबवावा

The Clear News Desk by The Clear News Desk
September 15, 2022
in मुक्ताईनगर, राजकीय
0
Share on FacebookShare on Twitter

मुक्ताईनगर (प्रतिनिधी) आता आपण विरोधी पक्षात आहोत. जनतेपर्यंत जाऊन त्यांच्या समस्या यात्रेच्या माध्यमातून जाणून घेता येतील त्या सोडविण्याचा प्रयत्न करता येईल रोहिणीताई खडसे या हे करत आहेत यातून निश्चितच पक्ष घराघरात जाईल इतर नेत्यांनी सुद्धा आपल्या मतदारसंघात जनसंवाद यात्रा सुरू करावी. प्रत्येकाच्या यात्रेच्या समारोपाला मी येईल. रोहिणीताई खडसे यांनी सुरू केलेल्या जनसंवाद यात्रेच्या समारोप समारंभाला 1 डिसेंबर 2022 रोजी मी स्वतः उपस्थित राहील, अशा शब्दात विरोधी पक्षनेते अजितदादा पवार यांनी रोहिणीताई खडसे यांच्या जनसंवाद यात्रेचे कौतुक केले.

मतदारसंघातील प्रत्येक गावांत वस्त्यांवर पाड्यावर जाऊन तिथल्या नागरिकांशी संवाद साधणे त्यांचे प्रश्न समजून घेणे, त्या सोडविण्याचा प्रयत्न करणे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ध्येय धोरणे जनतेपर्यंत पोहचवणे यासाठी माजी मंत्री एकनाथराव खडसे, जिल्हाध्यक्ष रविंद्र भैय्या पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली रोहिणीताई खडसे यांनी मुक्ताईनगर मतदारसंघात 15 ऑगस्ट पासून राष्ट्रवादी जनसंवाद यात्रेला सुरुवात केली आहे. दि 15 ऑगस्ट 2022 रोजी स्वातंत्र्य दिनाच्या पाश्वभूमीवर निघालेली ही यात्रा भारताच्या संविधान स्विकृत दिनी म्हणजे 26 नोव्हेंबर रोजी पुर्ण होईल. मुक्ताईनगर विधानसभा क्षेत्रात असणाऱ्या 182 गावांमध्ये हि यात्रा जाणार आहे.

READ ALSO

जळगावच्या राजकारणात मोठा भूकंप: राष्ट्रवादी पक्षाच्या बड्या नेत्याचा पुत्र भाजपच्या वाटेवर!

खडसेंचा विधानपरिषदेत सरकारवर प्रहार: नाशिकमधील ९ कोटींच्या अवैध गुटखा प्रकरणावरून प्रशासनाला धारेवर धरले

दि 14 सप्टेंबर पर्यंत हि यात्रा राऊतझिरा, शेवगा, धोनखेडा, कुऱ्हा हरदो, जुनोने, सोनाटी, आमदगाव, हिंगणे, शिरसाळे, चिचखेडा सिम,कोल्हाडी, नांदगाव,नाडगाव,दादा नगर, प्रतिभानगर,पळासखेड,वरखेड खु, वरखेड बु, राजुर, एनगाव,लोणवाडी, जामठी,येवती, रेवती,चीचखेडा प्रगणे, शेलवड,मुक्तळ,वाकी, बोरगाव, जलचक्र खु, जलचक्र बु, जलचक्र तांडा, वराड बु, वराड खु, साळशिंगी,करंजी, पाचदेवळी,गोळेगाव खु, गोळेगाव बु, भानखेडा,धानोरी, विचवे, धामणगाव तांडा, बोरखेडा नवे, धामणगाव, मोरझिरा, बोरखेडा जुने, बोरखेडा नवे, थेरोळा, कोऱ्हाळा,पिंप्राळा,तालखेडा, चिचखेडा खु,धुळे, पावरी वाडा, भोटे, रिगाव ,सुळे, आदी 57 गावांमध्ये आतापर्यंत पोहचली असून या ठिकाणचा नागरिकांचा मिळालेला प्रतिसाद उत्साहवर्धक आहे. या यात्रेदरम्यान रोहिणीताई खडसे आणि पक्षाचे पदाधिकारी मतदारसंघातील प्रत्येक घरापर्यंत जात आहेत. नागरिकांच्या समस्या जाणून घेत आहेत. छोट्या मोठ्या समस्या तात्काळ तिथल्या तिथे मार्गी लावत आहेत. मोठ्या समस्या किंवा सार्वजनिक प्रश्नांबाबत संबंधित कार्यालयाशी, विभागाशी संपर्क साधून एकनाथराव खडसे,रविंद्र भैय्या पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून सोडविण्याचा प्रयत्न करत आहेत. यात्रेदरम्यान युवकांना राष्ट्रवादी काँग्रेसचे सभासद होण्याचे आवाहन करत असून त्याला मोठा प्रतिसाद लाभत आहे. अनेक युवक, नागरिक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करत आहेत यातून पक्ष संघटन वाढत आहे.

आज दि 15 सप्टेंबर रोजी छत्रपती संभाजी महाराज नाट्यगृह जळगाव येथे विधानसभेचे विरोधी पक्षनेते ना. अजितदादा पवार यांच्या अध्यक्षतेखाली कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी रोहिणी खडसे यांनी विरोधी पक्षनेते अजितदादा पवार यांना जनसंवाद यात्रेच्या आतापर्यंत झालेल्या प्रवासाचा अहवाल सादर केला. यावेळी अजितदादा पवार यांनी रोहिणी खडसे यांच्याकडून जनसंवाद यात्रेची विस्तृत माहिती जाणून घेतली. व आपल्या अध्यक्षीय भाषणात मनोगत व्यक्त करताना ना.अजितदादा पवार म्हणाले की, रोहिणीताई खडसे यांचा जनसंवाद यात्रेचा उपक्रम कौतुकास्पद आहे.

कष्टकरी शेतकरी माय भगिनी आणि युवकांच्या सन्मानासाठी राष्ट्रवादी आपल्या भेटी हे ब्रिदवाक्य घेऊन सुरू केलेली जनसंवाद यात्रा पक्षवाढी साठी आणि जनतेसोबत संपर्क साधण्यासाठी एक संधी आहे. आता आपण विरोधी पक्षात आहोत. जनतेपर्यंत जाऊन त्यांच्या समस्या यात्रेच्या माध्यमातून जाणून घेता येतील. त्या सोडविण्याचा प्रयत्न करता येईल. रोहिणीताई खडसे हे करत आहेत. यातून निश्चितच पक्ष घराघरात जाईल. इतर नेत्यांनी सुद्धा आपल्या मतदारसंघात जनसंवाद यात्रा सुरू करावी. प्रत्येकाच्या यात्रेच्या समारोपाला मी येईल. रोहिणीताई खडसे यांनी सुरू केलेल्या जनसंवाद यात्रेच्या समारोप समारंभाला 1 डिसेंबर 2022 रोजी मी स्वतः उपस्थित राहील असे अजितदादा पवार यांनी यावेळी जाहीर केले.

यावेळी व्यासपीठावर माजी मंत्री एकनाथराव खडसे, विधानसभेचे माजी अध्यक्ष अरुणभाई गुजराथी,आ. अनिलदादा पाटील, माजी मंत्री सतिषअण्णा पाटील, गुलाबराव देवकर, जिल्हाध्यक्ष रविंद्रभैय्या साहेब पाटील, माजी आमदार राजीव देशमुख, संतोष चौधरी, साहेबराव पाटील,जगदीश वळवी, एजाजभाई मलिक,विलास पाटील, नामदेवराव चौधरी,संदिप पाटील,अशोक लाडवंजारी, रवींद्र नाना पाटील, वंदना ताई चौधरी,उमेश नेमाडे, अरविंद चितोडीया, सोपान पाटील, मजहर पठाण, मंगलाताई पाटील,तिलोत्तमाताई पाटील, कल्पनाताई पाटील,इंदिरा ताई पाटील, अरविंद मानकरी,ललित बागुल,अभिषेक पाटील, योगेश देसले,रिंकू चौधरी,वाल्मिक पाटील, संजीव पाटील, ईश्वर रहाणे, रमेश नागराज पाटील, राजेश वानखेडे,यु डी पाटील,आबा पाटील,निवृत्ती पाटील, विशाल महाराज खोले, रामदास पाटील,डॉ बी.सी. महाजन, दिपक पाटील, प्रदिप साळुंखे, सोपान दुट्टे,रवींद्र दांडगे, रणजित गोयनका, नंदकिशोर हिरोळे, बाळा भाल शंकर,निलेश पाटील, भरत अप्पा पाटील, विनोद कोळी, प्रदिप बडगुजर, विजय चौधरी नईम खान लता सावकारे, माया बारी, श्रीकांत चौधरीआणि जिल्हाभरातील पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

जळगावच्या राजकारणात मोठा भूकंप: राष्ट्रवादी पक्षाच्या बड्या नेत्याचा पुत्र भाजपच्या वाटेवर!

March 13, 2026
जळगाव

खडसेंचा विधानपरिषदेत सरकारवर प्रहार: नाशिकमधील ९ कोटींच्या अवैध गुटखा प्रकरणावरून प्रशासनाला धारेवर धरले

March 9, 2026
जळगाव

नगरसेवक डायरी पुन्हा सुरू करा ; नगरसेविका वैशाली पाटील यांनी महापौर दीपमाला काळे यांना दिले निवेदन !

February 27, 2026
जळगाव

महाराष्ट्र भाजपची SIR समिती जाहीर; मंगेश चव्हाण यांच्यावर महत्त्वाची जबाबदारी !

February 24, 2026
जळगाव

ढोल-ताशांच्या गजरात, घोषणांच्या निनादात, पोलीस कॉलनी परिसरात मनसेच्या नव्या शाखेचा शुभारंभ..

February 18, 2026
एरंडोल

एरंडोलमध्ये भाजपकडून हर्षवर्धन सपकाळ यांच्या वक्तव्याचा तीव्र निषेध

February 16, 2026
Next Post

ब्रेकिंग न्यूज : किरणकुमार बकालेंचा पाय खोलात ; जिल्हापेठ पोलिसात गुन्हा दाखल !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

गुड न्यूज : आज तब्बल ११ तालुके निरकं ; ४१ रुग्णांची कोरोनावर मात !

November 17, 2020

शासकीय आयटीआयमध्ये ११ डिसेंबर रोजी शिकाऊ उमेदवारी प्रशिक्षण भरती मेळावा !

December 6, 2023

मोदी, शाह यांनी सतत दौरे करण्यापेक्षा मुंबईतच फ्लॅट घ्यावा ; सुषमा अंधारे यांची सडकून टीका !

February 13, 2023

राज्यपालांचे निर्णय चुकीचे पण उद्धव ठाकरेंनी…; जाणून घ्या…सर्वोच्च न्यायालयाने निकालात नेमकं काय काय म्हटलं?

May 11, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group