धरणगाव (प्रतिनिधी) येथील मुस्लिम पंचमंडळातर्फे धरणगाव शहरात सामूहिक विवाहाचे आयोजन दिनांक 26 मे रोजी आयोजित केले होते.
याप्रसंगी समाज बांधवांना मार्गदर्शन करताना जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री तथा महाराष्ट्र राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील साहेब यांनी सांगितले की, सामूहिक विवाह ही काळाची गरज आहे. एक लग्न करता करता किती अडचणी येतात हे तुम्हा आम्हा सर्वांना माहिती आहे. त्यामुळे असे सामूहिक विवाह प्रत्येक समाजात होणे काळाची गरज आहे. मुस्लिम समाजाने जो सामूहिक विवाह आयोजित केला असेच विवाह इतर समाजानेही करावे व पैसा वेळ धावपळ याचा विचार करून प्रत्येकाने असे विचार केले तर ते शक्य आहे. मुस्लिम समाजाच्या या सामूहिक विवाहसाठी माजी मंत्री गुलाबरावजी देवकर, शिवसेनेचे जिल्हा संपर्क प्रमुख गुलाबराव वाघ,माजी नगराध्यक्ष सुरेश नाना चौधरी,शिवसेना उपजिल्हा प्रमुख पी.एम.पाटील सर,जीवण आप्पा बयस, पप्पूभाऊ भावे, वासुदेव चौधरी, विजय महाजन, अभिजीत पाटील,सुरेश महाजन,विलास महाजन, वाल्मीक पाटील,टोनी भाऊ महाजन, कैलास माळी सर, ललित येवले, तोसिफ पटेल,अहमद पठाण,नंदकिशोर पाटील, रवींद्र महाजन,मच्छिंद्र पाटील, सद्दाम पठाण, आसिफ शेख,कालू उस्ताद, काझी जनाब सर्व जाती-धर्माचे कार्यकर्ते पदाधिकारी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
विवाह सोहळ्यास १ लाख रुपये देणगी !
मोमीन समाजाच्या सामूहिक विवाह निमित्ताने मोमीन समाजाचे पंचमंडळ महाराष्ट्र राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांना निमंत्रण पत्रिका देण्याकरिता त्यांच्या निवासस्थानी गेले होते. त्याप्रसंगी पालकमंत्र्यांनी मोमीन समाजाच्या विवाह सोहळ्यास १ लाख रुपये देणगी दिली. याप्रसंगी पंचमंडळासोबत शिवसेनेचे मुस्लिम समाजातील पदाधिकारी आणि लोकनियुक्त नगराध्यक्ष स्वर्गीय सलीम पटेल यांचे चिरंजीव तोसिफ पटेल उपस्थित होते.