मुंबई (वृत्तसंस्था) मुंबईतील वर्सोवा भागामध्ये एका गॅस सिलेंडरच्या गोदामाला भीषण आग लागल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. आग लागल्यामुळे एकापाठोपाठ सिलेंडरचा स्फोट होत आहे. या दुर्घटनेत चार जण जखमी झाले आहे. या होत असलेल्या स्फोटांनी परिसर चांगलाच हादरला आहे.
मुंबईतील वर्सोवा भागात एलपीजी गॅस सिलेंडरच्या गोदामाला आज सकाळी अचानक भीषण आग लागली. काही क्षणातच आगीचा भडका उडाला आणि संपूर्ण गोदाम आगीच्या भक्षस्थानी सापडले. एकापाठोपाठ सिलेंडरचा भीषण स्फोट होत आहे. या दुर्घटनेमध्ये चार जण जखमी झाले आहे. जखमींना कपूर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. ही घटना समजताच येथे अग्निशमन दलाच्या १६ गाड्या घटनास्थळी पोहोचल्या आहेत. अग्निशमन दलाकडून आग विझवण्याचे काम युद्धपातळीवर सुरु आहे. दरम्यान, सिलिंडरच्या स्फोटमुळे लागलेल्या आगीचे स्वरुप मोठे असल्याचे सांगण्यात येत आहे. अजूनही १६ अग्नीशमन दलाकडून आग विझवण्याचे काम सुरु आहे.