बोदवड (प्रतिनिधी) गणिताच्या अभ्यासामुळे आकलनाची चौकट वाढत असते,गणिताच्या संकल्पना व्यवस्थितपणे समजून घेतल्यास गणित विषय देखील खूप आनंददायी होऊ शकतो. त्यातून आकलनशक्ती वाढून सृजनशीलतेला चालना मिळू शकते.त्यामुळे कोणताही विषय समजायला गणिताची मदत होऊ शकते. त्यामुळे जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी गणितात करिअर करावे, असे आवाहन जामनेर महाविद्यालयाचे प्राचार्य प्राध्यापक ए. आर. पाटील यांनी केले.
संस्थेचे चेअरमन मिठूलाल अग्रवाल यांच्या प्रोत्साहनातून तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य प्राध्यापक अरविंद चौधरी यांच्या नेतृत्वाखाली सदर गणितीय पोस्टर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.या स्पर्धेचे उद्घाटन जामनेर महाविद्यालयाचे प्राचार्य प्राध्यापक ए. आर. पाटील यांनी केले. बोदवडच्या न. ह. रांका कनिष्ठ महाविद्यालयाचे गणिताचे प्राध्यापक एच. एल. पाटील यांनी परीक्षक म्हणून कार्य केले. प्राचार्य प्राध्यापक अरविंद चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमासाठी गणित विभागप्रमुख डॉ.रुपेश मोरे, रुपाली चौधरी, योगेश व्यवहारे, डॉ.अनिल बारी, डॉ.नितेश सावदेकर, डॉ. चेतनकुमार शर्मा, डॉ गीता पाटील, डॉ.नरेंद्र जोशी, सौ.कांचन दमाडे, निलेश महाजन यांची प्रमुख उपस्थिती होती.
गणिताची भीती दूर व्हावी आणि गणिताच्या सहाय्याने मेंदूचा विकास व्हावा या उद्देशाने गणितीय पोस्टर स्पर्धा गणित विभागातर्फे घेण्यात आली. सदर पोस्टर व मॉडेल स्पर्धेत गणिताचे दैनंदिन जीवनातील विविध उपयोग, गणितातील विविध मनोरंजक कोडी,बारकोड ,विविध भौमितिक आकुत्या व त्यांचे उपयोग ,गमतीजमती तसेच गणिताचा संगीत ,वैद्यकीय ,शेती, हवामानशास्त्र ,व्यापार क्षेत्रात तसेच उपग्रह प्रक्षेपणसाठी, अर्थशास्त्रामध्ये, शेअर बाजारामध्ये कश्याप्रकारे वापर होतो याविषयांवर पोस्टर व गणितीय मॉडेल विद्यार्थ्यांनी तयार केली होती.
प्रास्ताविकात गणिताचे महत्त्व आणि गणिताविषयी जागृती करणे हा उद्देश सदर स्पर्धेचा असल्याचे विभागप्रमुख डॉ.रुपेश मोरे यांनी नमूद केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रीती पाटील यांनी केले. तर आभार प्रदर्शन भाग्यश्री ठाकरे यांनी केले.
सदर पोस्टरस्पर्धेला ४५ हून अधिक विद्यार्थ्यांनी स्वतः पोस्टर व मॉडेल तयार केलेत. यावेळी
रूपाली त्रंबक पाटील, कोमल अनिल कोकाटे यांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय, क्रमांक पटकावला. उर्मिला विजय हिवराये आणि गौरव प्रकाश वांगेकर यांनी तृतीय क्रमांकाचे पारितोषिक संयुक्तपणे मिळवले.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी कार्यालय अधीक्षक बाबुराव हिवराळे, विजय धोबी, अतुल पाटील, समीर पाटील,अजय शिंदे,प्रशांत महाजन, रोहन जावरे,वैभव जावरे तसेच महाविद्यालयातील सर्व कर्मचारीवर्गाने व विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले.