जळगाव (प्रतिनिधी) ए.टी.एम. द्वारा संचालित नाजिम मलिक उर्दू प्राथमिक शाळा उस्मानिया पार्क आयोजित मराठी भाषा गौरव दिनानिमित्त शाळेचे मुख्यध्यापक जुबेर शेख यांच्या अध्यक्षतेखाली तसेच प्राध्यापक रत्नाकर कोळी (नुतन मराठा महाविद्यालय , प्रसिद्ध अहिराणी गीतकार ) यांच्या प्रमुख उपस्थितीत मराठी भाषेचं महत्त्व या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले.
प्रारंभी मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. प्रास्ताविकात शबनम शेख यांनी कार्यक्रमाची भुमिका स्पष्ट केली. उम्मे एमन शेख या विद्यार्थीनीने प्रार्थना, आलिया,नजरिना यांनी मनोगत, जर्नुब,माहीन, आलिया खाटीक गृप काव्यवाचन आणि नाजमीन ने साभिनय काव्य वाचन केले. प्रा.रत्नाकर कोळी यांनी विद्यार्थाशी संवाद साधताना अल्पसंख्याक भाषिकांनी बहुसंख्येने बोलली जाणारी तसेच सरकारी कार्यालयीन असलेली मराठी भाषा आत्मसात केली तर रोजगाराच्या अनेक संध्या उपलब्ध होतील, भाषा ज्ञानासोबतच, नोकरीचे,रोजगाराचे आणि संवादाचे प्रभावी माध्यम आहे असे सांगून त्यांनी भाषेच महत्त्व सहजसोप्या भाषेत पटवून दिले.
उर्दु शाळेतील शिक्षकांनी मराठी भाषा गौरव दिवस साजरा करणे ही खरोखरच आनंदाची अनुभूती देणारी गोष्ट असून या
उर्दुच्या प्रांगणात मराठीचं रोपटं बहरून येवो असेही ते म्हणाले. कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री जुबेर सर यांनी महाराष्ट्रात राहणाऱ्या सगळ्याच जणांना मराठी भाषा लिहता,बोलता आणि वाचता आली पाहिजे असे आवाहन केले. दरम्यान मराठी भाषा गौरव दिनाचे औचित्य साधून मराठी लेखन स्पर्धा घेण्यात आल्या यातील बक्षिसपात्र विद्यार्थ्यांना बक्षिस देऊन गौरविण्यात आले.
निकाल-
इ. ५ वी
उम्मे हानिया याकुब गवळी (प्रथम)
बुसरा आसिफ खान ( द्वितीय)
तहेरीम रईस शाह ( तृतीय)
इ. ६ वी
असरा अंजुम शेख जुल्फेकार (प्रथम)
शिफत नाज शेख जावेद कुरेशी ( द्वितीय)
जिकरा शेख जाफर ( तृतीय)
इ. ७ वी –
शामिया फतिमा मुबारक अली खान ( प्रथम)
इन्शा नाजली शेख मोईनोद्दीन ( द्वितीय)
उमर खान जावेद खान ( तृतीय)
सुत्रसंचलन शबनम शेख यांनी आभारप्रदर्शन जाहिद शेख यांनी तर कार्यक्रम यशस्वीतेसाठी शाळेचे शिक्षक मुजम्मिल सर, नविद अन्सारी सर,नविद गफ्फार सर,मीनाज़् मिस ,तसलीम मिस यांनी परिश्रम घेतले. या प्रसंगी शाळेचे सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आणि बहुसंख्य विद्यार्थी उपस्थित होते.