जळगाव (प्रतिनिधी) साऱ्या जगाला शांती, अहिंसा व करुणेचे मार्ग दाखवणारे महाकारूणीक तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या जयंतीनिमित्त आज सकाळी शहरातील जिल्हा सामान्य रुग्णालय जवळील तथागत भगवान गौतम बुद्ध, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अर्धाकृती पुतळ्याला महापौर जयश्रीताई महाजन यांनी माल्यार्पण करून अभिवादन केले.
यावेळी बुद्ध वंदना घेण्यात आली. याप्रसंगी आरपीआयचे अध्यक्ष अनिल अडकमोल यांनी तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या कार्याला उजाळा दिला. जे,डी भालेराव, प्रताप बनसोडे, प्रविण परदेशी, किरण अडकमोल, सिद्धार्थ गवाणे, अजीज शेख, संतोष सोनवणे, सागर पवार, मिलींद सोनवणे, सागर सपकाळे आदी उपस्थित होते.