TheClearNews.Com
Monday, April 13, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

कोरोनाबाबत वस्तुनिष्ठ माहिती देतानाच माध्यमांनी जनजागृती करावी – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आवाहन

माध्यमांतील आरोग्य प्रतिनिधींशी मुख्यमंत्र्यांनी साधला संवाद

The Clear News Desk by The Clear News Desk
April 7, 2021
in राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

मुंबई (वृत्तसंस्था) राज्यातील कोरोना महामारीवर नियंत्रण मिळविण्यासाठी राज्य शासनाने केलेली नियमावली, उपाययोजना यांची वस्तुनिष्ठ माहिती नागरिकांपर्यंत पोहोचवितानाच माध्यमांनी जनजागृती करावी. साथीच्या आजाराचा मुकाबला करण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन हा लढा यशस्वी करूया असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज केले.

विविध माध्यमांमध्ये आरोग्य विषयक पत्रकारीता करणाऱ्या प्रतिनिधींशी आज मुख्यमंत्र्यांनी दृरदृष्य प्रणालीद्वारे संवाद साधला. यावेळी राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे, वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख, मुख्य सचिव सीताराम कुंटे, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव आशीषकुमार सिंह, प्रधान सचिव विकास खारगे, आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास, टास्क फोर्सचे सदस्य डॉ. शशांक जोशी आदी उपस्थित होते.

READ ALSO

जळगावच्या राजकारणात मोठा भूकंप: राष्ट्रवादी पक्षाच्या बड्या नेत्याचा पुत्र भाजपच्या वाटेवर!

घरकुल अनुदानात वाढ करून प्रलंबित कामे मार्गी लावा; आमदार एकनाथराव खडसेंची विधानपरिषदेत आक्रमक मागणी

यावेळी माध्यम प्रतिनिधींनी कोरोना नियंत्रणाबाबत, आरोग्य व्यवस्था, औषधांची उपलब्धता, कोरोना चाचण्या, लसीकरण आदी विविध मुद्द्यांवर अनुभव कथन करतानाच काही सूचनाही केल्या. त्या सूचनांचे स्वागत करतानाच हा संवाद यापुढेही कायम ठेवण्यात येईल, असे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

नियमावलीची माहिती सोप्या भाषेत द्यावी

मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले, कोरोनाच्या दुसऱ्या टप्प्यात सर्वाधिक रुग्णवाढ महाराष्ट्रात होत आहे. ही रुग्णवाढ थांबविण्यासाठी राज्य शासन अनेक उपाय योजना करीत आहे. नियमावली जाहीर केली आहे. लोकांना त्याविषयी सोप्या भाषेत माहिती देताना कोरोना नियंत्रणासाठी अनावश्यक गर्दी टाळणे, मास्क वापरणे, सुरक्षित अंतर ठेवणे या सुचनांचे पालन करणे किती आवश्यक आहे हे समजून सांगायची आवश्यकता आहे. माध्यमांनी जनजागृती करण्यासाठी पुढाकार घेण्याचे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी यावेळी केले.

कोरोना विरुद्धच्या लढ्यात माध्यमांचा सूचनात्मक सहभाग असावा

कोरोना विरुद्धची लढाई एकट्या शासनाची नसून त्यात सर्वांचा सहभाग महत्वाचा आहे. कोरोना विरुद्धच्या या लढ्यात उपाययोजना, नियमावलींमध्ये सुधारणा व्हावी यासाठी माध्यमांचा सूचनात्मक सहभाग असावा, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. लसीकरणाच्या पहिल्या आणि दुसऱ्या डोस नंतर किती जणांना पुन्हा कोरोनाची बाधा झाली याविषयी अभ्यास करण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी आरोग्य विभागाला केल्या. राज्यातील नागरिकांना प्रबोधनातून दिलासा देतानाच कोरोनाला रोखण्यासाठी एकत्र येवूया, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी यावेळी केले.

शासकीय आरोग्य संस्थांमधील नेत्रोपचार विभाग बंद राहणार नाही

कोरोना रोखण्यासाठी शासन करीत असलेल्या उपाययोजनांबाबत लोक मन तयार करण्याच काम माध्यम प्रतिनीधींनी करावे, असे सांगतानाच कोरोनाकाळात राज्यातील शासकीय आरोग्य संस्थांमधील मोतीबिंदू शस्त्रक्रिया, नेत्रउपचार विभाग बंद राहणार नाही याची दक्षता घेण्यात येईल, अशी ग्वाही आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी यावेळी दिली. राज्य कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणात आघाडीवर असून त्याला वेग येण्यासाठी महाराष्ट्राला दर आठवड्याला ४० लाख डोसेस देण्याची आग्रही मागणी केंद्र शासनाकडे केल्याचे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले. रेमडीसीवीर उत्पादन करणाऱ्या कंपन्यांशी चर्चा करणार असून एमआरपीचा आधार घेऊन विक्रेते जास्त किंमतीने त्याची विक्री करणार नाही यासाठी उपाययोजना करण्याची सूचना केल्याचे त्यांनी सांगितले.

रुग्णांना बेड मिळवून देणारा मुंबई महापालिका पॅटर्न राज्यभर

कोरोना रुग्णांना रुग्णालयातील बेड उपलब्ध करून देणारी मध्यवर्ती यंत्रणा मुंबई महापालिकेने तयार केली असून त्यामुळे रुग्णांना बेड मिळण्यासाठी सुविधा निर्माण झाली आहे. राज्यभर अशाचप्रकारे यंत्रणा निर्माण व्हावी यासाठी मुंबई महापालिका पॅटर्न सर्वत्र राबविण्याचा निर्णय झाल्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी यावेळी सांगितले. आज सकाळी राज्यातील सर्व जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त, पोलिस अधीक्षकांशी व्हीडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून आढावा घेतल्याचे सांगतानाच जिल्हा यंत्रणेने कोरोना नियमांची अधिक प्रभावी अंमलबजावणी करावी असे निर्देश दिल्याचे मुख्य सचिवांनी सांगितले.

यावेळी आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी सादरीकरण करतांना राज्यातील कोरोना रुग्णस्थिती आणि आरोग्य सुविधांची माहिती दिली. यावेळी पत्रकार संदीप आचार्य, सुमित्रा देब रॉय, तबस्सुम बर्नगरवाला, शर्मिला कलगुटकर, भाग्यश्री भुवड, सुरज पांडे, स्वप्नील मिश्रा यांनी मनोगत व्यक्त केले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

जळगावच्या राजकारणात मोठा भूकंप: राष्ट्रवादी पक्षाच्या बड्या नेत्याचा पुत्र भाजपच्या वाटेवर!

March 13, 2026
जळगाव

घरकुल अनुदानात वाढ करून प्रलंबित कामे मार्गी लावा; आमदार एकनाथराव खडसेंची विधानपरिषदेत आक्रमक मागणी

March 12, 2026
जळगाव

खडसेंचा विधानपरिषदेत सरकारवर प्रहार: नाशिकमधील ९ कोटींच्या अवैध गुटखा प्रकरणावरून प्रशासनाला धारेवर धरले

March 9, 2026
जळगाव

चाळीसगावच्या विकासाला अर्थसंकल्पातून मोठी चालना – २३८ कोटींची भरीव तरतूद!

March 7, 2026
जळगाव

स्मार्ट मीटर बसविण्यात महाराष्ट्राचा देशात प्रथम क्रमांक

February 19, 2026
राज्य

केंद्रीय अर्थसंकल्पात सहकारी क्षेत्राला विशेष प्राथमिकता – रोहित निकम

February 2, 2026
Next Post

लॉकडाऊनचा निर्णय मागे घ्या, अन्यथा रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही : प्रकाश आंबेडकर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

गोदामातून चोरट्यांनी ४८ हजारांचा मुद्देमाल केला लंपास

May 28, 2025

धक्कादायक : चाळीसगावात चार वर्षीय चिमुकलीवर अत्याचार ; आरोपीस अटक !

November 28, 2021

धरणगाव येथे मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमाअंतर्गत उद्योजकता परिचय प्रशिक्षण व कर्ज मेळाव्याचे आयोजन !

July 10, 2023

‘कराची’ एक दिवस भारताचा भाग असेल : देवेंद्र फडणवीस

November 23, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group