मुंबई (वृत्तसंस्था) कृषी कायद्याबाबत आजच्या बैठकीत चर्चा होत आहे. या बैठकीला हजेरी लावण्यापूर्वी अजित पवारांनी माध्यमांशी संवाद साधला. अजित पवार म्हणाले, “आज कृषी कायद्याबाबत प्राथमिक चर्चा होत आहे. एका बैठकीतून प्रश्न सुटणार नाही. माझी वैयक्तिक भूमिका महाविकास आघाडीची नाही”
आता आपल्या देशातील शेतकरी आंदोलन करत आहेत. सुप्रीम कोर्टानेही केंद्राला सांगितलं चर्चा करा. ते आंदोलन चिघळलं आहे. शेतकरी म्हणतात आमची भूमिका मान्य करा. काही प्रमाणात काही निर्णय घेतले जातील. बिल रद्द करा असं शेतकरी संघटनांचं मत आहे. महाविकास आघाडी सरकारने या बिलाविरोधातील आंदोलनाला तिन्ही पक्षाने समर्थन दिलं आहे. आज प्राथमिक चर्चा होणार आहे. आज काही म्हणतील हे बिल संपूर्ण रद्द करा. सगळ्यांशी चर्च करु. मात्र एका बैठकीतून प्रश्न सुटणार नाही. ही माझी वैयक्तिक भूमिका आहे, महाविकास आघाडीची नाही” असं अजित पवारांनी नमूद केलं. दिल्लीत आंदोलन सुरु आहे. त्या दबावाखाली केंद्र बदल करेल असा अंदाज आहे. ते बदल काय असतील त्यात शेतकरी हित असेल का? हे पाहू असंही अजित पवारांनी नमूद केलं आहे. अतिवृष्टीने नुकसान झालेल्या भागाची पाहणी करण्यासाठी केंद्रीय पथक महाराष्ट्रात येत आहे. आमचा अंदाज आहे त्यात काही मदत होईल, किती होईल सांगणे उचित होणार नाही, असं अजित पवारांनी सांगितलं.
















