अमळनेर (प्रतिनिधी) आज महाराष्ट्र राज्य परीट धोबी सेवा मंडळाची मिटींग प्रदेशाध्यक्ष विवेक ठाकरे, कोअर कमेटी सदस्य ईश्वर मोरे, जिल्हाध्यक्ष कैलास शेलोडे व जिल्ह्यातील इतर पदाधिकारी यांच्या उपस्थितीत पार पडली सदर मिटिंग मध्ये संघटनेच्या ध्येय धोरणावर व समाजसेवेवर चर्चा करण्यात आली. त्यांनंतर पदाधिकारी निवड कार्यक्रम घेण्यात आला.
प्रदेशाध्यक्ष विवेक ठाकरे, ईश्वर मोरे, जिल्हाध्यक्ष कैलास शेलोडे कोअर कमिटीचे सदस्य ईश्वर मोरे यांनी प्रदेश कार्य कारणी सदस्यपदी अनिल रामदास मांडोळे म्हणून नियुक्ती पत्र दिले तसेच तालुकाध्यक्ष अमुत उत्तम जाधव यांची पुन्हा फेरनिवड करण्यात आली. युवा संघटनेच्या तालुकाध्यक्ष पदी गणेश विक्रम नेरकर तर युवा शहराध्यक्ष मधुकर सोनू निंबाळकरव यांना नियुक्ती पत्र देण्यात आले. सदर बैठकीस जिल्हाकार्याध्यक्ष रमेश ठाकरे, भुसावळ तालुकाध्यक्ष नरेंद्र वाघ, मनीष बाविस्कर, दीपक मांडोळे, रवींद्र जाधव, दिपक वाल्हे, गंगाराम वाल्हे, अनिल वाघ, जगतराव निकुंभ, प्रकाश पवार, ज्ञानेश्वर जाधव, किशोर वाघ, बाळु जाधव, गोरख चित्ते, मोतीलाल जाधव, विजय वाघ, सतिष पवार, किशोर महाले, अनिल वाल्हे, नवनियुक्त पदाधिकारी सह इत्यादी समाज बांधव उपस्थित होते.