TheClearNews.Com
Thursday, August 27, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

मोठी बातमी : रोहित निकम यांची लॉटरी लागण्याची शक्यता बळावली….!

दिल्लीत भाजपच्या अंतर्गत गोटात मोठी खलबत ; फडणवीस आणि महाजनांच्या संमतीनेच ठरणार उमेदवार !

The Clear News Desk by The Clear News Desk
March 9, 2024
in जळगाव, राजकीय
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) जळगाव लोकसभा मतदार संघात उमेदवार बदलाची मोठी चर्चा सुरु आहे. दिल्लीत भाजपच्या अंतर्गत गोटात मोठी खलबत सुरु असून अचानक रोहित निकम यांच्या नावावर गंभीररित्या चर्चा सुरु असल्याचे वृत्त समोर आले आहे. तर अन्य काही इच्छुक उमेदवारांची लॉबिंग सुरु केली आहे. परंतू उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मंत्री गिरीश महाजन यांच्या संमतीनेच राज्यासह जळगाव आणि रावेर लोकसभा मतदार संघातील अंतिम उमेदवार निश्चित केला जाणार असल्याचे बोलले जात आहे. विशेष म्हणजे रोहित निकम हे फडणवीस आणि महाजन यांच्या गोटातील असल्यामुळेच त्यांची लोकसभेची लॉटरी लागण्याची शक्यता बळावली आहे.

निकामांमुळे दोन्ही लोकसभा मतदार संघात फायदा !
भारतीय जनता पक्षाने खानदेश किंबहुना महाराष्ट्रातील लोकसभेच्या निवडणुकीसाठी मतदार संघ निहाय उमेदवार घोषीत केलेले नसले तरी बहुंताश चेहरे निश्चित केले असल्याचे बोलले जात आहे. तर काही नावावर अंतिम विचार सुरू आहे. रोहित निकम यांच्या मित्रांचा आणि नातेवाईकांचा गोतावळा जिल्ह्यात विस्तारलेला आहे. तसेच रोहित यांचे आजोबा बॅरिस्टर देवराम निकम हे चोपडा मतदार संघातून 1955 ते 1959 ला आमदार म्हणून निवडून आले होते. आजही निकम परिवाराचा चोपडा विधानसभा मतदार संघात मोठा जनसंपर्क आहे. त्यामुळे भाजपने त्यांना उमेदवारी दिल्यास रावेर मतदार संघातील उमेदवारालाही या गोष्टीचा मोठा फायदा होऊ शकतो.

READ ALSO

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस एक वर्ष कारावास; जैन इरिगेशन कंपनीला ३० लाखांची नुकसान भरपाई

रावेरात अल्पवयीन मुलीला बेकायदेशीरपणे लॉजमध्ये रूम देणाऱ्या मॅनेजरला अटक

ग्रामीण भागातील शेवटच्या कार्यकर्त्यापर्यंत थेट संपर्क !
सहकार क्षेत्रातील उदयोन्मुख युवा नेता म्हणून जळगाव लोकसभा मतदासंघातील रोहित निकम यांच्याकडे बघितले जाते. तसेच निकम हे आयटी सेक्टरमध्ये काम करत असल्यामुळे त्यांचा जिल्ह्यासह राज्यातील तरुणांशी थेट संपर्क आहे. शिवाय बुथ कमेटीवरही ते काम करीत असल्याने भाजपाच्या शहरी, ग्रामीण भागातील शेवटच्या कार्यकर्त्यापर्यंत त्यांचा असलेल्या थेट संपर्क त्यांच्यासाठी मोठी जमेची बाजू आहे. एकंदरीत सर्व जमेच्य बाजूला लक्षात घेता रोहित निकम यांचे नाव आघाडीवर नव्हे तर जवळपास निश्चित मानले जात आहे. अगदी पक्षश्रेष्ठींकडून रोहित निकम यांच्या नावाबाबत संसदीय बोर्डाच्या बैठकीत सकारात्मक चर्चा झाल्याचे कळते.

जिल्ह्यातील मंत्र्यांसह मतदार संघातील आमदारांसोबत सलोख्याचे संबंध !
मराठा समाजातील एक नवीन चेहरा आणि निकम कुटुंबाची सामाजिक प्रतिष्ठा लक्षात घेता रोहित निकम यांचे नाव सर्वात आघाडीवर असल्याचे दिसून येत आहे. विशेषत: भाजपचे नेते तथा ग्राम विकास मंत्री गिरीश महाजन, आमदार मंगेश चव्हाण यांचे ते विश्वासू सहकारी म्हणून ओळखले जातात. एवढेच नव्हे तर पालकमंत्री गुलाबराव पाटील, मंत्री अनिल पाटील, आमदार किशोरआप्पा पाटील, आमदार चिमणराव पाटील यांच्यासह महायुतीतील प्रमुख नेत्यांसोबत सलोख्याचे संबंध आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहिती नुसार मतदार संघातील लोकप्रतिनिधींसोबत असलेले मैत्रीपूर्ण संबंधच रोहित निकम यांच्यासाठी प्रभावी ठरणार असल्याचे कळते.

…म्हणून संसदीय बोर्डाचे सदस्य सकारात्मक विचार !
जळगाव जिल्ह्याच्या सहकार क्षेत्रातील नवी पिढीतील प्रभावी व्यक्तीमत्व म्हणून त्यांची वेगळी ओळख निर्माण झाली आहे. विद्यमान खासदार उन्मेष पाटील यांना रीप्लेस करून नव्या दमदार चेहऱ्याला तसेच निवडून येण्याची हमखास शक्यता गृहीत धरून निकम यांच्या नावाचा विचार भाजपच्या संसदीय बोर्डाचे सदस्य सकारात्मक विचार करत असल्याची चर्चा आहे. तथापि राजकारणातील काही बाबी या शक्यतांचा खेळ म्हणूनच बघितले जाते. लोकसभा निवडणुकीसाठी रोहित निकम यांच्या नावाची चर्चा वरीष्ठ पातळी वरून सुरू असल्याने या चर्चेला अधिकच महत्व आले आहे. दरम्यान, जळगाव लोकसभेसाठी चाळीसगावचे विद्यमान खासदार उन्मेश पाटील यांचे तिकीट कट झाल्यास भाजपाकडून युवा चेहरा असलेल्या रोहित निकम यांना संधी मिळण्याची शक्यता यामुळेच वाढल्या आहेत. विद्यमान खासदार उन्मेश पाटील वा रोहित निकम यांनी संधी न मिळाल्यास माजी खासदार ए.टी.नाना पाटील व माजी आमदार स्मिता वाघ यांच्या नावाचाही विचार होवू शकतो, असेदेखील सूत्रांकडून समजते.

जळगाव जिल्ह्यात नातेवाईकांसह मित्र परिवाराचा मोठा गोतावळा !
रोहित निकम हे जळगाव जिल्हा मार्केटींग फेडरेशनचचे संचालक, तसेच जिल्हा दूध संघाचे संचालक ‘कृभको’मुबंई चे सदस्य आहेत तसेच इतर सहकार संस्थावर ते सदस्य म्हणून कार्य करीत आहेत. त्यांच्या मातोश्री शैलजा दिलीप निकम या जिल्हा बँकेच्या संचालक आहेत तसेच माजी जिल्हा परीषद सदस्याही आहेत. वडिल दिलीप निकम हे प्रगतीशील शेतकरी असून तर काका अ‍ॅड.उज्वल निकम हे राज्याचे विशेष सरकारी वकिल आहेत. एवढेच नव्हे तर, रोहित निकम यांचे आजोबा बॅरिस्टर देवराम निकम यांच्या नावाला जळगाव जिल्ह्यात एक वेगळं सामाजिक आणि राजकीय,सामाजिक वलय आहे. यामुळे जळगाव लोकसभाच नव्हे तर रावेर मतदार संघातही याचा लाभ भाजप उमेदवाराला होऊ शकतो, असे बोलले जात आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस एक वर्ष कारावास; जैन इरिगेशन कंपनीला ३० लाखांची नुकसान भरपाई

August 26, 2026
गुन्हे

रावेरात अल्पवयीन मुलीला बेकायदेशीरपणे लॉजमध्ये रूम देणाऱ्या मॅनेजरला अटक

August 26, 2026
जळगाव

जळगावच्या औद्योगिक विकासाला गती; ‘डी प्लस’ धोरणाचा प्रस्ताव तातडीने सादर करण्याच्या सूचना

August 26, 2026
गुन्हे

एकाच रात्री तीन घरांमध्ये चोरट्यांची हातसफाई

August 26, 2026
गुन्हे

महावितरणच्या एरियल बंच केबलमध्ये छेडछाड; चाळीसगावात एकावर गुन्हा दाखल

August 25, 2026
जळगाव

एमएसईबी ऑफिसर्स असोसिएशनची कार्यकारिणी जाहीर

August 25, 2026
Next Post

Horoscope Today : आजचं राशीभविष्य 9 मार्च 2024 !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

डी जी पाटील यांची जिल्हा नियोजन समितीवर सदस्य म्हणून नियुक्ती

March 17, 2021

शेतात बेकायदा वाळूची साठवन; शेतमालकावर होणार दंडात्मक कारवाई

November 15, 2020

कोकण प्रादेशिक विभागाच्या सहव्यवस्थापकीय संचालकपदी चंद्रकांत डांगे रुजू

April 20, 2022

BHR Scam : गुन्हा दाखल झाला पुण्यात ; खळबळ उडाली चाळीसगावच्या राजकीय वर्तुळात !

January 17, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group