धरणगाव (प्रतिनिधी) तालुका क्रीडा शिक्षकांची बैठक माजी नगराध्यक्ष पी.एम. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच उत्साहात पार पडली. या बैठकीत तालुका क्रीडा संकुलाच्या दुरवस्थेवर चर्चा झाली.
धरणगाव तालुका क्रीडा संकुलना संदर्भात सदर बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. तालुका क्रिडा संकुल होऊन अनेक दिवस झाले. परंतु त्यांची परिस्थिती अतिशय दयनीय झाली असून त्या क्रीडा संकुलाचा वापर विद्यार्थी,क्रीडा प्रेमी,ज्येष्ठ नागरिक यांच्या ऐवजी आंबट शौकीन जास्त वापर करत असल्यामुळे क्रीडाप्रेमींमध्ये संतापाची लाट उसळली आहे. एक कोटी रुपये खर्च करून सुद्धा क्रीडा संकुलाचा वापर खेळाडूसाठी होत नसेल. तर त्याला काय अर्थ? अशी प्रतिक्रिया सर्व क्रीडा शिक्षकांनी व्यक्त केल्या. याप्रसंगी भानुदास विसावे,नगराध्यक्ष निलेश चौधरी, मुख्याधिकारी जनार्दन पवार, कैलास माळी यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
अध्यक्षीय भाषणात पी एम पाटील सर यांनी सांगितले की, ना.गुलाबरावजी पाटील यांच्या सहकार्याने तात्काळ क्रीडासंकुल ताब्यात घेऊन त्याची देखभाल केली जाईल. तसेच लवकरात लवकर तालुका क्रीडा संकुलन खेळाडूंसाठी वापरण्यात योग्य केले जाईल. देखभाल करण्यासाठी लवकरात लवकर स्थानिक समिती स्थापन करण्यात येईल, असे आश्वासन दिले. प्रस्ताविक तालुका क्रीडा शिक्षक संघटनेचे अध्यक्ष सूर्यवंशी एस.एल. पाटील यांनी केले. या प्रसंगी नगरसेवक अजय चव्हाण, क्रीडाशिक्षक व्ही.पी.महाले,डी.एन.पाटील, आर.बी. महाले,जे.एस. ओस्तवाल, गावित सर, विकास शिरसाठ,कल्पेश महाजन आदी उपस्थित होते. आभार प्रदर्शन विजय महाजन यांनी मानले.