मुंबई (वृत्तसंस्था) महाराष्ट्र शासनाच्या भूमी अभिलेख विभागात (Department of Land Records Maharashtra) इथे लवकरच तब्बल १०१३ जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (Mahabhumi Recruitment 2021) जारी करण्यात आली आहे. भूकरमापक तथा लिपिक या पदांसाठी ही भरती (Maharashtra Government Jobs) असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख ३१ डिसेंबर २०२१ असणार आहे.
भूकरमापक पदांच्या एकूण १०१३ जागा
पुणे विभाग १६३ जागा, कोकण विभाग २४४ जागा, नाशिक विभाग १०२ जागा, औरंगाबाद विभाग २०७ जागा, अमरावती विभाग १०८ जागा आणि नागपूर विभागात १८९ जागा.
शैक्षणिक पात्रता
उमेदवाराने मान्यताप्राप्त अभियांत्रिकी महाविद्यालयातील किंवा संस्थेतील स्थापत्य अभियांत्रिकी पदविका किंवा इय्यता दहावी उत्तीर्णसह औद्योगिक प्रशिक्षण संस्थामधून दोन वर्षाचा सर्वेक्षक कोर्स पूर्ण केलेला असावा.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ३१ डिसेंबर २०२१ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.