जळगाव (प्रतिनिधी) शासन परिपत्रकात मोहरमच्या ९ तारखेला “कत्ल कि रात” ऐवजी “शहादत किंवा बलिदान की रात” म्हणून उल्लेख करण्यात यावा, अशी मागणी करत जळगाव सुन्नी मुस्लीम बांधव यांनी मुख्यमंत्री यांना जिल्हाधिकारी तसेच पोलीस अधीक्षक यांच्याद्वारे निवेदन पाठवून साकडे घालण्यात आले आहे.
निवेदनात म्हटले आहे की, शासनाने मोहरम सण साजरे करण्यासाठी जे परिपत्रक काढलेले आहे त्यानुसारच व नियमांचे काटेकोर तसेच तंतोतंत पालन करून आम्ही सण साजरा करू. या शासन परिपत्रकात मोहरमच्या ९ तारखेचा उल्लेख “कत्ल कि रात” असा करण्यात आलेला असून सामान्य लोकांसाठी कत्ल हा उल्लेख बरोबर आहेच, परंतु कत्लचा साधारणत : मुर्दा (मयत) असा घेतला जातो. परंतु जे लोक अल्लाहच्या दिन (धर्म)साठी आपला जीव देतात. त्यांच्यासाठी शहादत या शब्दाचा उल्लेख केला जातो. कारण की, कुरान शरीफच्या पारा (अध्याय) क्र. २ मध्ये अल्लाहने त्यांना जिवंत म्हटलेले आहे. “शहादत किंवा बलिदान” या शब्दाने माहिती होते की, हे कोणते सामान्य कत्ल नसून एक अत्यंत खास असे कत्ल आहे. म्हणजेच अल्लाहच्या मार्गावर आपला जीव अर्पण करणे असा होतो. असे यात म्हटले आहे.
शासन परिपत्रकात मोहरमच्या ९ तारखेला “कत्ल कि रात” ऐवजी “शहादत किंवा बलिदान की रात” म्हणून उल्लेख करण्यात येऊन सरकार इमाम हुसेन रजि अल्लाह अनहू यांचा व मुस्लिम बांधवांचा योग्य सन्मान करण्यात यावा, यासाठी आज दि. १० ऑगस्ट २०२१ रोजी मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य, मुंबई यांना जळगाव जिल्हाधिकारी तसेच जिल्हा पोलीस अधीक्षक जळगाव यांच्याद्वारे निवेदन पाठवून साकडे घालण्यात आले.
याप्रसंगी सून्नी ईदगाह ट्रस्ट जळगाव व सून्नी जामा मस्जिद जळगावचे अध्यक्ष सै. अयाज अली नियाज अली, रशिद कुरेशी, अहमद खान, सय्यद जावेद, अब्दुल मुस्तकीम बहेस्ती, सय्यद उमर अली, शेख शफी, शेख मोहम्मद, जाफर बहेस्ती आदी उपस्थित होते.