नागपूर (वृत्तसंस्था) रेल्वे प्रवासादरम्यान महिला रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेसाठी’ मेरी सहेली’ हे अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानात विशेष रेल्वे हावडा मुंबई एक्सप्रेस, हावडा अहमदाबाद एक्सप्रेस, गोंदिया मुंबई एक्सप्रेस, नागपुर मुंबई दुरोंतो एक्स्प्रेस, या रेल्वेंचा समावेश करण्यात आला आहे.
या कालावधीत प्रवास करणाऱ्या महिलांना आरपीएफच्या महिला कर्मचारी व अधिकारी प्रवासात होणाऱ्या प्रत्येक त्रासाबद्दल विचारपूस करण्यात येते. महिलांना काही समस्या असल्यास त्वरित त्यांचे निदान करण्यात येते. तसेच सुरक्षेसाठी असलेल्या १८० या हेल्पलाइनची माहिती महिलांना देण्यात येते. सहप्रवाशांकडून कुठलीही खाद्यपदार्थ घेऊ नये, त्यांना आपल्या प्रवासाबाबत माहिती देऊ नका, खाद्यपदार्थ आरसीटीसी च्या पेंट्री कार मधूनच खरेदी करा, आपल्या सामाना काळजी आपणच घ्या. बर्थच्या खाली असलेल्या लोखंडी रोडला आपले सामान बांधणे आवश्यक्य आहे. खिडकीजवळ बसताना आपल्या दागिन्यांची काळजी घेणे. तसेच फिजिकल डिस्टन्स ठेवून तोंडाला मास्क लावणे. या सूचना अभियानातुन महिलांना देण्यात येत आहेत.