TheClearNews.Com
Saturday, October 10, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

विद्यापीठाच्या ऑनलाइन परीक्षा घोळाची चौकशी करा ; विद्यापीठ कृती समितीची मागणी !

The Clear News Desk by The Clear News Desk
October 6, 2021
in जळगाव, शिक्षण
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) येथील कवियत्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील ऑनलाईन परीक्षेच्या घोटाळ्याची चौकशी करा व बेकायदेशीर नियुक्त केलेले प्र.कुलसचिव यांचा राजीनामा त्वरित घ्यावा, अशी मागणी कृती समितीने केली आहे.

कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील ऑनलाईन परीक्षेचे बील रुपये पाच कोटीपर्यंत आलेले असल्याने सदर बीलाबाबत प्रसार माध्यमात उलट सुटल बातम्या येवूनही याची अद्यापपावेतो कुठलीही चौकशी झालेली नाही. तसेच विद्यापीठाने देखील याची गांभिर्याने नोंद घेतलेली नाही. असे असतांना करोडो रुपयांची बेकायदेशीर बिले मंजुर करुन घेवून अदायगी करण्यात येत आहे. सदरची बाब अतिशय गंभीर असून, विद्यापीठाची आर्थिक स्थिती कमकुवत होत आहे. या बेकायदा बीलाची चौकशी न झाल्यास पर्यायाने विद्यापीठातील कर्मचाऱ्यांचे भविष्यात वेतनदेखील यापुढे वेळेवर होणार नाही. अशी भयावह परिस्थिती उदभवणार आहे. तरी अशा प्रकारचे गैर व्यवहार होत असलेल्या बीलांची शासनामार्फत चौकशी व्हावी, अशी मागणी कृति समितीने केली आहे.

READ ALSO

अपघाताच्या घटनेत गुटख्याचे बिंग फुटले; 7.70 लाखांचा मुद्देमाल जप्त

मुख्य अभियंता आय. ए. मुलाणी यांच्या हस्ते ‘वारी’च्या कलावंतांचा सत्कार

तसेच विद्यापीठातील एका वरिष्ठ प्राध्यापकाने नियमानुसार विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरु डॉ.ई.वायुनंदन यांचेकडे रितसर अर्ज करुन प्र.कुलगुरु पदावर काम करण्याची संधी द्यावी अशी विनंती केली होती. कारण प्र.कुलगुरु पद जास्तीत जास्त सहा महिन्यांपर्यंत एका व्यक्तीकडे सोपवता येते. प्र.कुलगुरु पदावर सदरच्या व्यक्तीला सहा महिन्यांपेक्षा जास्त कालावधी लोटला गेल्यामुळे त्यांनी तसा अर्ज दिलेला होता. सदरचा अर्ज प्रभारी कुलगुरु डॉ.ई.वायुनंदन यांनी तेव्हा विद्यापीठाचे कायदा अधिकारी भादलीकर यांच्याकडे कायदेशीर अभिप्रायासाठी पाठविला असता, कायदा अधिकारी यांनी सदर अर्जाच्या अनुषंगोने प्र.कुलगुरु डॉ.बी.व्ही.पवार यांच्याशी संगणमत करुन प्र.कुलसचिवपद नियम बाह्यरित्या पात्रता नसतांना भादलीकर यांच्याकडे सोपवून दोघांची वर्णी लावून घेतली आहे. अशी विद्यापीठ गोठात मोठया प्रमाणात कर्मचाऱ्यांमध्ये आणि समाज माध्यमांमध्ये चर्चा सुरु आहे. अशा प्रकारचे अनेक नियमबाहय कामे सध्या प्रभारी राजवटीत विद्यापीठात सुरु आहेत.

दरम्यान आज विद्यापीठ कर्मचाऱ्यांचा लेखणी बंद आंदोलनाचा दुसरा दिवस असून, सदर दिवशी कर्मचाऱ्यांचा उत्स्फुर्त प्रतिसाद मिळालेला आहे. वास्तविक प्रभारी कुलगुरु वायुनंदन हे विद्यापीठात नसतांना त्यांच्या ऐवजी प्र.कुलगुरु डॉ.बी.व्ही.पवार यांनी विद्यापीठातील कर्मचाऱ्यांचे आंदोलन चर्चेव्दारे सोडवणे आवश्यक होते. त्यासाठी दि. ४ ऑक्टोंबर २०२१ रोजी विद्यापीठाचे व्यवस्थापन परिषद सदस्यांनी मध्यस्थीकरुन प्र.कुलगुरुं डॉ.बी.व्ही.पवार यांच्या समवेत झालेल्या चर्चे अंती प्रभारी कुलगुरु डॉ.ई.वायुनंदन यांच्याशी चर्चाकरुन आपणास निर्णय देता, असे कृतिसमितीस आश्वासन दिले होते. तथापि, अद्यापपावेतो भादलीकर यांना प्र.कुलसचिव पदावरुन हटवलेले नाही.

विद्यापीठातील समस्त कर्मचारी विद्यापीठातील बेकायदेशीरपणे नियुक्त केलेले प्र.कुलसचिव डॉ.भादलीकर यांच्या राजीनाम्यावर ठाम असून, जो पर्यंत त्यांचा राजीनामा घेतला जात नाही, तोपर्यंत कोणत्याही परिस्थितीत आंदोलन मागे घेतले जाणार नाही, असे कृतिसमितीचे ठाम मत असून, विद्यापीठ प्रशासनाला याबाबतची जाणीव करुन दिलेली आहे. आज संध्याकाळपर्यंत भादलीकर यांना बेकायदा नियुक्त केलेल्या प्र.कुलसचिव पदावरुन न हटविल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल. व याची सर्वस्वी जबाबदारी प्रशासनाची राहील, असे विद्यापीठ कृतिसमितीने कळविले आहे.

यावेळी सचिव भैय्यासाहेब हिंमतराव पाटील, अध्यक्ष शरद पंडीतराव पाटील, उपाध्यक्ष सुरेश दंगलराव चव्हाण, कार्याध्यक्ष महेश लक्ष्मण पाटील, समन्वयक जगदीश नारायण सुरळकर, समन्वयक दुर्योधन बाबुराव साळुंखे आदी उपस्थित होते.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

अपघाताच्या घटनेत गुटख्याचे बिंग फुटले; 7.70 लाखांचा मुद्देमाल जप्त

October 10, 2026
जळगाव

मुख्य अभियंता आय. ए. मुलाणी यांच्या हस्ते ‘वारी’च्या कलावंतांचा सत्कार

October 10, 2026
धरणगाव

तळई विद्यालयाच्या नवनियुक्त अध्यक्ष व पदाधिकाऱ्यांचा सत्कार

October 10, 2026
गुन्हे

वृद्ध शेतकऱ्याची २ लाखांची रोकड लांबवली

October 10, 2026
जळगाव

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 10 ऑक्टोबर 2026 !

October 10, 2026
गुन्हे

‘प्रगतिशील महाराष्ट्र’ प्रदर्शनाला मुख्य अभियंता आय.ए. मुलाणी यांची भेट

October 9, 2026
Next Post

'रामायणा'त रावणाची भूमिका साकारणारे अरविंद त्रिवेदी यांचं निधन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

देशात गेल्या २४ तासांत आढळले २५,०७२ कोरोनाबाधित, ३८९ रुग्णांचा मृत्यू

August 23, 2021

बापरे ! तीन बहिणींची भररस्त्यात युवकाला मारहाण ; कारण ऐकून तुम्हीही व्हाल आश्चर्यचकित

February 24, 2022

अमळनेर समता परिषदेतर्फे ओबीसी आरक्षण बचावासाठी तहसीलदारांना निवेदन

November 26, 2020

अशोक जैन यांच्यासह जैन परिवाराने बजावला मतदानाचा हक्क

November 20, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group