TheClearNews.Com
Tuesday, June 16, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

जळगाव दुध संघ अपहार प्रकरण : अखाद्य तुपाने बनवलेल्या चॉकलेटच्या माध्यमातून लहान मुलांच्या जीविताशी खेळ?

नातेवाईकामार्फत मिळत असलेले टेंडरही रडारवर ; कोण-कोण घेत होते कमिशन?

The Clear News Desk by The Clear News Desk
November 16, 2022
in गुन्हे, जळगाव, राजकीय
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) दूध संघातील अपहारप्रकरणी दाखल असलेल्या गुन्ह्यात आतापर्यंत शहर पोलिसांनी सहा जणांना अटक केली आहे. यातील रवी मदनलाल अग्रवाल (रा. अकोला) आणि चंद्रकांत मोतीराम पाटील उर्फ सी.एम. पाटील (जळगाव) यांना अटक केल्यानंतर न्यायालयात हजर केले असता दोघांना १९ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडीत सुनावण्यात आली आहे. दरम्यान, यातील अग्रवाल हे दुध संघातील बी ग्रेडच्या तूपापासून लहान मुलांमध्ये प्रचंड आवडीचे असलेले राजमलाई हे चॉकलेट बनवत असल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे बी ग्रेडचे तूप मानवी आरोग्यासाठी हानिकारक असल्याचे माहित असूनही त्याचा गोरखधंदा सुरु असल्याची धक्कादायक माहिती पोलीस तपासात समोर आली आहे.

चॉकलेट बनवून लहान मुलांसह लोकांचा जीव आणला धोक्यात !
संशयित आरोपी रवि मंदनलाल अग्रवाल हे कैलादेवी कुटीर उद्योग नावाने राजेमलाई चॉकलेटचा व्यवसाय करत होते. ते विठ्ठल रुख्मीणी एजन्सीकडून बी ग्रेड तुप खरेदी करत होते. बी ग्रेडचा वापर Not For Human Use (मानवी वापरास निषिद्ध) असल्याचे त्यांना ते माहीत असूनही त्यांनी ते खरेदी केले. तसेच त्याचा राजेमलाई चॉकलेट बनविण्यासाठी वापर करत होते. संशयित आरोपी मनोज लिमये, हरी पाटील आणि रवि अग्रवाल यांना देखील याबाबतची कल्पना होती. तरी देखील त्यांनी त्याचा वापर करून लहान मुले व लोकांचे जिवन देखील धोक्यात आणले. त्यामुळे पोलीस आता याची सखोल चौकशी करून तपास करून यामागे त्यांच्या व्यतिरिक्त आणखी कुणाचा हात होता, याची सखोल चौकशी करणार आहेत.

READ ALSO

भडगावमध्ये जुन्या वादातून महिलेवर जीवघेणा हल्ला

किरकोळ कारणावरून बाप, लेकाला मारहाण

कोणतीही पावती दिली जात नव्हती, नातेवाईकामार्फत मिळत असलेले टेंडरही रडारवर !
संशयित आरोपी रवि अग्रवाल याला संशयित आरोपी हरी पाटील यांच्याकडून घेत असलेल्या बी ग्रेड तूपाबाबतची पुर्ण कल्पना असताना देखील बी ग्रेड तूप मोठया प्रमाणात खरेदी करत होते. त्यांना कोणत्याही प्रकारची पावती दिली जात नव्हती. ती का दिली जात नव्हती?, या मागचे कारण काय व हे करण्यास कोण भाग पाडत होते? याचा देखील पोलीस कसून चौकशी करणार असल्याचे कळते. संशयित आरोपी सी.एम.पाटील याचा नातेवाईक किशोर काशीनाथ पाटील हा असल्याची माहिती कळते. विशेष म्हणेज त्याच्याच नावावर विठ्ठल रुख्मीणी एजन्सी घेतली असून सदरची एजन्सी घेण्यामागे त्यांचा उद्देशय काय होता? याचा सखोल तपासही पोलीस करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. तर संशयित आरोपी चंद्रकांत मोतीराम पाटील हे प्रशासक मडंळाचे महत्वाच्या पदावर नेमणुकीस होते. यामुळे त्यांना सदरचे कृत्य करण्यासाठी कोण आदेश देत होता? व त्यांचे इतर साथीदार कोण आहेत?, याचा सखोल तपास देखील पोलीस करणार आहेत. एवढेच नव्हे तर विठ्ठल रुख्मीणी एजन्सीकडून खरेदी केलेले बी ग्रेड तुप देखील जप्त होणार असल्याचे कळते.

जामिन मिळण्यासाठी सहकार्य आणि कोण-कोण घेत होते कमिशन?
सदर गुन्हयातील अटकेतील संशयित आरोपी मनोज लिमये हे जळगाव जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाचे जबाबदार अधिकारी असतानाही त्यांनी या गुन्हयातील एका आरोपीसोबत संगणमताने बिलिंगच्या दस्ताऐवजमध्ये फेरफार करून बनावटी दस्तऐवज तयार केले आहेत. तसेच संशयित आरोपी निखील नेहते यांना जामिन मिळण्यासाठी सहकार्य केले असून त्याने असे कोणाचे सांगण्यावरून केले याचा देखील सखोल तपास होणार असल्याचे कळते. धक्कादायक म्हणजे जामीनसाठी कार्यालयाचे कर्मचारी देखील पुरविण्यात आले असून औरगांबाद येथे मा. न्यायालयात वकील यांची नियुक्ती करून दिली. तसेच दूध संघाची गाडी करून गुन्हयात सहकार्य केले असल्याचे कळते. तसेच अपहारचा प्रकार कोणाच्या सांगण्यानुसार केला जात होता? तसेच साक्षीदार यांच्या म्हणण्याप्रमाणे दूध संघात खरेदी विक्री व्यवहारातून लिमये व श्री. पाटील हे कमीशन घेत का? याबाबतही सखोल चौकशी होणार आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

भडगावमध्ये जुन्या वादातून महिलेवर जीवघेणा हल्ला

June 15, 2026
अमळनेर

किरकोळ कारणावरून बाप, लेकाला मारहाण

June 15, 2026
अमळनेर

अमळनेर बसस्थानकातून पोत चोरणाऱ्या २ महिलांना २ तासात केली अटक

June 14, 2026
गुन्हे

घरमालकाच्या साडेतीन लाखांच्या दागिन्यांवर मोलकरणीचा डल्ला

June 14, 2026
गुन्हे

शेती करण्यासाठी न दिल्याने कुऱ्हाडीच्या दांडक्याने मारहाण

June 12, 2026
गुन्हे

महामार्गावर चार जणांना चाकूचा धाक दाखवून लुटले

June 12, 2026
Next Post

जळगाव न्यायालयाच्या आवारातच राडा ; खावटीच्या केसमध्ये पती-पत्नीच्या परिवारात हाणामारी !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

नरेंद्र मोदींचे तीन यार – नाटक, दंगल आणि अत्याचार ; ओवेसींचा हल्लाबोल

January 2, 2022

जळगाव जिल्ह्याचा पारा 43 अंशावर !

April 25, 2025

माजी समाज कल्याणमंत्री बबनराव घोलप यांचे जळगाव जिल्ह्यात जंगी स्वागत !

December 1, 2021

भाजपच्या राष्ट्रपतीपदाच्या उमेदवार मुर्मू यांना शिवसेनेचा पाठिंबा !

July 12, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group