जळगाव (प्रतिनिधी) दोन वर्षांसाठी जळगाव जिल्ह्यातून हद्दपार केलेल्या संशयित आरोपीने कुठलेही परवानगी न घेता पोलीस अधिक्षक यांच्या आदेशाचे उल्लंघन केल्याने एमआयडीसी पोलीसांनी कारवाई केली. ही कारवाई रविवारी २१ जुलै रोजी सायंकाळी साडेसात वाजता एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उदय रमेश मोची (वय २६, रा. रामेश्र्वर कॉलनी), असे कारवाई केलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे.
जळगाव शहरातील रामेश्र्वर कॉलनीतील बांधाजवळील उदय मोची याला दोन वर्षांसाठी हद्दपार करण्यात आले आहे. परंतु त्याने पोलीस अधीक्षक किंवा शासनाची कुठलीही परवानगी न घेता, तो शहरातील त्याच्या घरी आलेला होता. पोलिसांनी त्याच्या घराची तपासणी केली असता, तो घरी मिळून आला. त्याने पोलीस अधीक्षक यांनी पारित केलेल्या आदेशांचे उल्लंघन केल्याप्रकरणी पोलीस कर्मचारी किरण पाटील यांनी दिलेल्या तक्रारीवरुन रविवारी सायंकाळी साडेसात वाजता संशयित उदय रमेश मोची याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस नाईक विकास सातदिवे हे करीत आहे.