जळगाव (प्रतिनिधी) राज्यस्तरीय कौशल्य स्पर्धा परीक्षामध्ये आयटीआय जळगाव येथील मशिनिस्ट व्यवसायाचा मिलिंद निकम याने सुतार काम स्किलमध्ये गोल्ड मेडल प्राप्त केले आहे. शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था जळगाव येथील जिल्हास्तरावर कौशल्य स्पर्धा परीक्षेमध्ये जिल्ह्यातून प्रथम क्रमांकाने मिलिंद निकमची राज्यस्तरावर निवड झाली होती.
दि. ३ सप्टेंबर रोजी राज्यस्तरीय कौशल्य स्पर्धा परीक्षा संपन्न झाल्या. त्यामध्ये आयटीआय जळगाव येथील मशीनिस्ट ट्रेडचा मिलिंद निकम यांनी सुतारकाम या कौशल्य स्किल राज्यातून गोल्ड मेडल प्राप्त केले आहे. आज दि. ५ सप्टेंबर रोजी शिक्षक दिनानिमित्त कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मंत्रालयाचे मंत्री नवाब मलिक आणि व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयचे संचालक दिगंबर दळवी यांच्या हस्ते मिलिंद निकम यांना राज्य स्तरावरील कौशल्य स्पर्धा परीक्षामध्ये गोल्ड मेडल ट्रॉफी आणि रोख दहा हजार बक्षीस देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला आहे.
नॅशनल स्तरावरील बेंगलोर येथे होणाऱ्या कौशल्य स्पर्धा परीक्षांमध्ये त्यांची निवड झाली असून आयटीआय जळगाव या संस्थेचे नाव त्याने रोशन केले आहे. मिलिंद निकम हा जळगावचा रहिवासी असून त्याने बीए शिक्षण झाल्यानंतर आयटीआय मशिनिस्ट प्रवेश घेतला होता. सुरुवातीपासूनच त्याला कलाकुसरीचे काम करणे आवडीचे छंद असल्याने त्याचा हा छंद आज आयटीआयच्या मशिनिस्ट ट्रेडच्या माध्यमातून त्याला सुतारकाम स्किलमध्ये गोल्ड मेडल प्राप्त करून त्याने राज्यभरातून आयटीआयचे नाव लौकीक केले आहे.
या मिळालेल्या यशाबद्दल संस्थेचे प्राचार्य अनिल चौधरी, उपप्राचार्य आर आर पाटील, पगारे, गट निदेशक चौधरी, धांडे, घोडके यांनी मिलिंद निकम यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आणि निकमचे व्यवसाय निर्देशन, शिल्प निर्देशक डीएस सौदाणे आणि प्रमुख मार्गदर्शक आरे सपकाळे, सुतार निर्दशक यांचे अभिनंदन केले आहे.















