नवी दिल्ली (वृत्तसंस्था) पंतप्रधान मोदींनी आज २९ नोव्हेंबर रोजी त्यांनी ‘मन की बात’ कार्यक्रमाद्वारे देशवासियांशी संवाद साधला. मोदी म्हणाले की, अंजिठ्याच्या लेण्यांचा वारसाही डिजिटल करण्यात येत आहे. यामध्ये अजिंठा लेण्यांची संपूर्ण झलक पाहायला मिळेल.
मोदी म्हणाले की, डिजिटलाइज्ड आणि पुन्हा स्थापन केलेल्या कलाकृती यांच्या बरोबरच यासंबंधित दस्तऐवज आाणि अनेकांनी व्यक्त केलेल्या शब्दभावना, यांचाही समावेश असेल. आपली एक अतिशय प्राचीन काळातली देवी अन्नपूर्णा मातेची मूर्ती कॅनडावरून परत भारतात येतेय. ही मूर्ती जवळपास १०० वर्षांपूर्वी वाराणसीच्या एका मंदिरातून चोरून बाहेर पाठवली होती, अशी माहिती पंतप्रधान मोदींनी दिली. पंतप्रधान मोदी म्हणाले की, १२ नोव्हेंबरपासून डॉक्टर सलीम अलीजी यांच्या १२५ व्या जयंतीच्या कार्यक्रमाला प्रारंभ झाला आहे. डॉक्टर सलीम अली यांनी पक्ष्यांच्या दुनियेमध्ये, पक्षी निरीक्षणासंबंधी अतिशय उल्लेखनीय कार्य केलं आहे. न्यूझीलँडमध्ये नव्यानं निवडून आलेले संसद सदस्य डॉ. गौरव शर्मा यांनी या विश्वातल्या सर्वात प्राचीन भाषांपैकी एक असलेल्या संस्कृत भाषेतून शपथ घेतली. मी गौरव शर्मा जी, यांना शुभेच्छा देतो.