जळगाव (प्रतिनिधी) आसोदा येथील वीजभट्टीवर आग लागल्याची माहिती मिळताच मंत्री गुलाबराव पाटलांनी अग्निशामक गाडी पाठवल्याने आगीवर नियंत्रण मिळाले. यामुळे संबंधिताचे अधिकचे नुकसान टळले आहे.
आसोदा येथील जितेंद्र आनंदा कुंभार यांच्या वीजभट्टीवर शनिवारी दुपारी २ वाजता अचानक आग लागल्याने मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. याठिकाणी चार लाखाचे रॉ-मटेरियल होते. आग वाढताच गावातील संजोग कोळी व पिंटू कोळी यांनी तुषार महाजन यांना घटना कळविली. त्यांनी तात्काळ पालकमंत्री गुलाबरावजी पाटील यांना माहिती दिली.
मंत्री महोदयांनी तात्काळ अग्निशामक गाडीची व्यवस्था करून देत आगीवर नियंत्रण मिळवून देण्यास मदत केली. या बचाव कार्यात बाळू बुधो कुंभार, भास्कर दादा कुंभार, किसन भाऊ कुंभार, संजय माळी, रवींद्र कुंभार, माळी डॉक्टर (फोटोग्राफर), अमोल कुंभार, चावदस कुंभार, संजय कुंभार, पिंटू वखार, पिंटू कोळी, तुषार महाजन यांनी सहकार्य केले.