भडगाव (प्रतिनिधी) तालुक्यातील एका गावातील बेपत्ता अल्पवयीन मुलीचा खुन प्रकरण संशयित स्वप्निल उर्फ सोन्या विनोद पाटील याला अटक करण्यात आली आहे. गुरुवारी सायंकाळी संशयिताला घटनास्थळाचा पंचनामा करण्यासाठी घेवून जात असतांना संतप्त झालेल्या जमावाने संशयिताला आमच्या ताब्यात द्या, असे म्हणत पोलिसांच्या वाहनावर दगडफेक केली. यामध्ये तीन ते चार पोलिस जखमी झाले असून पोलिसांच्या वाहनाचे नुकसान देखील झाले. यावेळी पोलिसांना जमाव पांगविण्यासाठी जमावावर लाठीचार्ज करावा लागला.
संशयितासोबत घटनाक्रम समजून घेण्यासाठी पोलीस गावात पोहोचताच जमाव झाला प्रक्षुब्ध !
भडगाव तालुक्यातील एका गावात अल्पवयीन मुलगी दि. ३० जून रोजी भ बेपत्ता झाल्याची तक्रार पोलीसात दाखल करण्यात आली होती. बेपत्ता अल्पवयीन मुलीचा पोलिस प्रशासनाकडून शोध सुरू असतांना दि. १ ऑगस्ट रोजी अल्पवयीन मुलीचा मृतदेह घरापासून जवळच असलेल्या मोकळ्या जागेत कडबा कुट्टी खाली आढळून आला. याबाबत पोलीसांकडून तपास सुरु असताना संशयित स्वप्नील उर्फ सोन्या विनोद पाटील (वय १९) याने हे मुलीवर अत्याचार करुन तीचा निर्घुन खून केल्याचे पोलिसांच्या तपासात उघड झाले. संशयिताकडून घटनास्थळाचा पंचनामा करुन घटनाक्रम समजुन घेण्यासाठी घटनास्थळी आणण्यात आले.
कर्मचारी जखमी, पोलिस वाहनाचे नुकसान !
संतप्त जमावाने पोलिसांवर दगडफेक केली. यामध्ये चाळीसगाव शहर वाहतूक शाखेची पोलीस गाडी (एम. एच. १९ई- ए ५९९७) या गाडीवर जमावाने दगडफेक केली. यात पोलीस गाडीचे नुकसान झाले आहे. तर भडगांव पो स्टेला कार्यरत असलेले पो.हे.का. नितीन रावते यांना कपाळावर दगड लागल्याने मोठी जखम झाली आहे. विलास पाटील भडगाव, चाळीसगाव शहर वाहतूक शाखेचे दिपक पाटील यांना हाताला तर प्रकाश पाटील पायाला मुक्काम मार लागून ते जखमी झाले आहेत.
गावात तणावपूर्ण शांतता !
घटनेची माहिती मिळताच अपर पोलिस अधीक्षक रमेश चोपडे, सहाय्यक पोलिस अधीक्षक अभयसिंह देशमुख, पाचोरा पो. नि. राहुल खताळ, चाळीसगांव वाहतुक शाखेचे सहाय्यक पोलिस निरिक्षक तुषार देवरे, भडगांव पोलिस निरिक्षक राजेंद्र पाटील, पोलिस उपनिरिक्षक शेखर डोमाळे भडगांव पाचोरा पोलिस स्टेशनचे पोलिस कर्मचारी, आरसीबी चे १ प्लाटुन सह २५ ३० पोलीस कर्मचारी यांनी चोख बंदोबस्त लावण्यात आला असून गावात तणावपुर्ण शांतत आहे.