जामनेर (प्रतिनिधी) जामनेर ते नाचनखेडा बसमध्ये एका अल्पवयीन विद्यार्थिनीचा बसमध्ये विनयभंग केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी पहूर पोलिसांनी पवन उमाकांत पाटील याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
या संदर्भात पिडीत तरुणीने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, ८ सप्टेंबर रोजी साडेपाच ते साडेसहा वाजेच्या दरम्यान, पिडीत अल्पवयीन विद्यार्थिनी बसने प्रवास करत होती. याचवेळी पाळधी चौफुली येथून पवन पाटील हा बसमध्ये चढला. यानंतर त्याने पिडीत विद्यार्थिनीच्या हाताला धरुन तिच्या मानस लज्जा उतपन्न होईल, असे कृत्य केले. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पो.उप निरीक्षक संजय बनसोड हे करीत आहेत.