जळगाव (प्रतिनिधी) शहरातील हरिविठ्ठल नगर व्यंकटेशनगर परिसरातील १७ वर्षीय विद्यार्थींनी कॉलेजला जात असल्याचे सांगत घरुन निघाली होती. मात्र वेळेत परत आली नाही म्हणुन कुटूंबीयांनी शोध घेतला. मिळून येत नसल्याने कुटुंबीयांनी अखेर तक्रार दिल्यावरुन याप्रकरणी रामानंदनगर पेलिसांत अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत वृत्त असे की, बेपत्ता विद्यार्थीनीच्या पालकांनी दिलेल्या तक्रारीत नमुद केल्या प्रमाणे त्यांची मुली आरती (काल्पनीक नाव) हि मंगळवार रोजी नेहमी प्रमाणे सकाळी कॉलेजला जाते. असे सांगत घरुन निघाली होती. संध्याकाळपर्यंत मुलगी घरी परत आली नाही म्हणून वडीलांनी पोलिस ठाण्यात हरवल्याची तक्रार दिली. हर्षद देशमुख याने आईवडलांच्या रखवालीतून अल्पवयीन मुलीचे अपहरण केल्याप्रकरणी गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास सहाय्यक निरीक्षक राजेश शिंदे करत आहेत.