जळगाव (प्रतिनिधी) भडगाव तालुक्यातील महावितरण कार्यालयात असलेल्या उपकार्यकारी अभियंता यांच्या कॅबीनची तोडफोड करत मारहाण केल्याची घटना घडली. यात कर्तव्यावर असलेले वायरमन गजानन राणे यांचा या मारहाणीत मृत्यू झाला. तर आमदारांच्या आंदोलनानंतर वायरमनचा मृत्यू झाला असून याला आमदार किशोर पाटील हेच जबाबदार असल्याचा गंभीर आरोप भाजपचे पाचोरा तालुकाध्यक्ष अमोल शिंदे यांनी केला आहे.
आमदार किशोर पाटील यांना शिवसेनेतील नुकत्याच झालेल्या बदलांमध्ये विचारात घेतले नाही. यामुळे त्यांनी लक्ष वेधून घेण्यासाठी आपल्याच सरकारच्या विरोधात आंदोलनाचा स्टंट केला आहे. आधी सात वर्षे आमदार असतांना त्यांना कधी शेतकर्यांचे हित दिसले नाही. आताच मात्र त्यांनी कथितरित्या आंदोलनाचा आव आणला असला तरी त्यांची ही पूर्ण नौटंकी असल्याची घणाघाती टीका भाजपचे तालुकाध्यक्ष अमोल शिंदे यांनी केली आहे.
यावेळी भाजपचे पाचोरा तालुकाध्यक्ष अमोल शिंदे म्हणाले की, मागील कोरोनाच्या काळापासून आता साधारण दीड वर्ष झालेत. लॉकडाऊन मध्ये शेतकऱ्यांचे हालअपेक्षा होत आहे. आजच्या वर्षभरापूर्वी सुद्धा ट्रान्सफॉर्मरमध्ये नादुरुस्त होत होते आणि ऑइल व यंत्र सामुग्री नसल्यामुळे साधारण पाचोरा भडगाव तालुक्यातील असलेल्या सर्व शेतकऱ्यांना ट्रान्सफॉर्मर मिळण्याकरिता दोन तीन महिन्याचा काळ लागत होता. अशी पद्धतीची भयावह परिस्थिती होती. मागच्या मार्चमध्ये कोरोनामुळे लॉकडाऊन झालं होत तेव्हा दूध संघाने सुद्धा दुधाचे रेट ७ ते १० रुपयांपर्यंत कमी केले होते. आताच्या काळात या महावितरणने लोकांना खूप त्रास दिला की सक्तीची वसुली करून सर्वसामान्यांचे वीज कनेक्शन कट केलेले होते. तसेच जोपर्यंत तुम्ही पैसे भरणार नाहीत. तोपर्यंत कुठल्याही प्रकारे तुम्हाला वीज कनेक्शन जोडता येणार नाही, अशा पद्धतीचं काम या निर्दयी ठाकरे सरकारने शेतकऱ्यांना आणि सर्व सामान्यांना त्रास देण्याचं केलंय.